Download App

Jagan Mohan Reddy : मोठी बातमी! रोड शोमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक

  • Written By: Last Updated:

Jagan Mohan Reddy : देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) रणसंग्राम सुरू आहे. भाजप (BJP), काँग्रेस (Congress) या राष्ट्रीय पक्षांबरोबर प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे. या पक्षांचे प्रमुख जोरदार प्रचार करत आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत अनेक उमेदवारांना रोषाला सामोर गेल्याचे आपण पाहिले आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये थेट मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy) यांच्यावर दगडफेक झाली आहे.

ते आपल्या उमेदवारासाठी रोड शो करत असताना ही घटना घडली. त्यात ते किरकोळ जखमी झालेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी राज्यात ‘मेमंथा सिद्धम’ नावाने बस यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा शनिवारी रात्री विजयवाडा येथे दाखल झाली. येथील सिंहनगरमध्ये मुख्यमंत्री सीएम जगन मोहन रेड्डी रोड शो करत होते. हा रोड शो विवेकानंद स्कूल सेंटर येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीमध्ये त्यांच्या डाव्या भुवयाला दगड लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला होता. यानंतर बसमधील उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार सुरु केले. प्राथमिक उपचारानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा रोड शो सुरु ठेवला. त्याचवेळी दगडफेकीदरम्यान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या शेजारी उभे असलेले आमदार वेलमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने उपचारही करण्यात आले.

प्ले स्कूलची फी चक्क सव्वा चार लाख रुपये, पोस्ट व्हायरल; सीए म्हणतो,माझ्या संपूर्ण शिक्षणापेक्षा…

आंध्र प्रदेशमध्ये 25 लोकसभा जागांसाठी 13 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या 25 मतदारसंघात अराकू, श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ले, काकीनाडा, अमलापुरम, राजमुंद्री, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टणम, मतदारसंघांमध्ये विजयवाडा, गुंटूर, नरसरावपेट, बापटला, ओंगोल, नंदयाल, कुरनूल, अनंतपूर, हिंदुपूर, कडप्पा, नेल्लोर, तिरुपती (राखीव), राजमपेट आणि चित्तूर यांचा समावेश आहे.

follow us