Download App

Subramanian Swamy : भाजप नेत्याचा ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा, निवडणूक आयुक्त हटवा

भाजपचे ( BJP )  ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी ( Subramanian Swamy ) यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी इलेक्शन कमिशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी इलेक्शन कमिशन बरखास्त करा, जनतेच्या माध्यमातून निवडूण आल्यावर इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्याची निवड करा, अशी मागणी केली होती. ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांवर केलेल्या या आरोपांवर सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट करत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांवर निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या मागणीचे समर्थन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाला हटवण्याच्या मागणीचे मी समर्थन करतो.  निवडणूक आयुक्तांचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद असल्याचं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह व शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला आहे. त्यामुळे आता अधिकृतपणे शिंदे यांचा गट शिवसेना म्हणून ओळखला जाईल. या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका देखील केली आहे.  सुब्रमण्यम स्वामी यांनी या अगोदर देखील भाजपचे नेते असून भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातील पंढरपूर कॉरिडॉरला त्यांनी विरोध दर्शवला आहे.

Tags

follow us