Download App

बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत पार्टी केल्याचा आरोप, बडगुजरांनी केला खुलासा, ‘माझा सलीम कुत्ताशी संबंध…’

  • Written By: Last Updated:

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला. भुसेंनी या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली. यावर आता सुधाकर बडगुजर यांनी भाष्य केलं. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतचा व्हायरल झालेला फोटो बनावट आहे. हा प्रकार मार्फिंगचा असून आपला कुत्ता याच्याशी काहीही संबंध नसल्याचं बडगुजर यांनी स्पष्ट केलं.

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट; कुटुंबियांनाही मृत्यूबाबत ‘संशय’च 

राणेंनी बडगुरजर यांचा फोटो विधानसभेत दाखवला. त्यानंतर मंत्री दादा भुसेंनी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. दाऊद इब्राहिम हा देशाचा नंबर वन शत्रू आहे. देशद्रोह्यासोबत पार्टी करणारे सुधाकर बडगुजर यांची चौकशी झाली पाहिजे, बडगुजर हा छोटा मासा आहे. त्याच्यावर वरदहस्त आहे. त्याची खोलात जाऊन चौकशी करा, असं भुसे म्हणाले होते. या सर्व आरोपांवर आता बडगुजर यांनी भाष्य केलं. त्यांनी आरोपांना प्रत्युत्तर देत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. उलट ड्रग्जसारख्या गंभीर व समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या, नव्या पिढीचे भवितव्य नष्ट करणाऱ्या आरोपींशी भुसेंचे काय संबंध आहे? भुसे दुसऱ्यावर आरोप करतात. मात्र, ललित पाटील प्रकरणातील त्यांचे कनेक्शन जगजाहीर आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असं बडगुजर म्हणाले.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार, रोहित शर्माला मोठा धक्का 

ते म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी आरोप केले. मात्र, त्यात तथ्य नाही. पालकमंत्री भुसे यांनी थोडा अभ्यास करायला हवा होता. मी अटकपूर्व जामीन वगैरे घेणार नाही. कारण, मी काहीच केलेलेन नाही. त्यामुळं मला भीती नाही. मात्र, भुसेंनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. राजकारणात येण्यापूर्वी भुसे नोकरी करत होते. त्या नोकरीतून त्यांना का निलंबित करण्यात आलं, हे त्यांनी सांगाव, अस बडगुजर म्हणाले.

ते म्हणाले, भाजपच्या महिला आघाडीच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी वेगळ्या विदर्भ राज्याला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचा अखंड महाराष्ट्राला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही रहाटकरांच्या भूमिकेच्या विरोधात होता. त्यांची नाशिकमधील सभा आम्ही उधळून लावली. त्यानंतर 2016 मध्ये माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मी 15 दिवस तुरुंगात होतो. बॉम्बस्फोटातील आरोपीही तिथे होते. त्याची आम्हाला कल्पना नव्हती. माझ्यावर जी केस झाली, ती राजकीय होती. त्यामुळं सलीम कुत्ता कोण, काय करतो, कुठं राहतो, याची आम्हाला काही कल्पना नाही. त्याच्याशी माझा संबंध नाही.

ते म्हणाले, आत्ता दाखवला जात असलेले फोटो चुकीच्या पद्धतीने मॉर्फ केलेले आहेत. गुन्हेगार तुरुंगात आहे तर तो बाहेर कसा आला? किंवा तो पॅरोलवर असताना सार्वजनिक कार्यक्रमात आमची भेट झालेली असू शकते. मात्र, मला काही माहीती नाही. माझा कधी त्याच्याशी संबंध आला नाही, असं बडगुजर म्हणाले.

Tags

follow us