दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट; कुटुंबियांनाही मृत्यूबाबत ‘संशय’च

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट; कुटुंबियांनाही मृत्यूबाबत ‘संशय’च

Disha Salian Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्यानंतर आज एसआयटीन दिशाच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, झालेल्या चर्चेत दिशाच्या कुटुंबियांना तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता याच आधारावर दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्यात येणार आहे.

Pune : पोटनिवडणूक टाळण्यासाठी आणखी एक आयडिया? आयोग सुप्रीम कोर्टात जाणार पण लगेच नाही!

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. या प्रकरणी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशीही झाली होती. मात्र, चौकशीअंती आदित्य ठाकरे यांनी क्लिनचीट देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणाची पोलखोल होणार असल्याचं बोललं जात आहे.

दिशा सालियनप्रकरणी आता पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. आज एसआयटीच्या पथकाने दिशाच्या कुटुंबियांची घेतली असून कुटुंबियांना संशय व्यक्त करीत सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. दिशाच्या कुटुंबालाही मृत्यूबाबत संशय असून योग्य चौकशी करुन सत्य समोर आणा, अशी मागणी दिशाच्या कुटुंबियांनी केली आहे.

आत्तापर्यंत कुटुंबियांनी कोणतीही शंका उपस्थित केली नव्हती मात्र, आता एसआयटी भेटल्यानंतर कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. दिशाच्या मृत्यूबाबत संशय दूर होण्यासाठी प्रयत्न करावेत. ही आत्महत्या नाही, हत्याही असू शकते, असा संशय दिशाच्या कुटुंबियांना आहे. त्यामुळे आता या प्रकरणी मुंबई पोलिसांसाठी मोठं ओपनिंग आहे.

‘बीड जाळपोळ घटनेची एसपींना पूर्वकल्पना होती’; जयंत पाटलांनी सांगितली आतली माहिती

याआधीच कुटुंबाच्या जबाबाच्या आधारेच ही फाईल बंद करण्यात आली होती. दिशाच्या मृत्यूनंतर या प्रकरणात राजकारण करु नका, दिशाची आत्महत्या असल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं. दिशाच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. त्यानंतर दिशाची केस बंद करण्यात आली होती. आता पुन्हा चौकशी सुरु होणार आहे.

आता तपासाच्या सुरुवातीलाच कुटुंबियांनी असा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनाही मोठा आधार मिळणार आहे. दिशा सालियन प्रकरणी अनेकांची चौकशी होणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता कुटुंबाचा नव्याने जबाब घेतला असून साक्षीदारांकडून माहिती घेण्यात येणार आहे. सोशल मीडियावरही अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांचाही जबाब नोंदवणार असल्याचं समोर येत आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांना समन्स दिला जाणार असून त्यांच्याकडे काय माहिती हे तपासण्या येणार आहे. टेक्निकल पुरावा, क्राईम ब्रॅंचची मदत घेऊन नवीन लिंक मिळते का? याचा तपास करणार आहेत. आता दिशाच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला वेगळ लागण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube