Download App

पवारांचा दौरा फुसका..,उरलेले लोकंही बाय-बाय करतील; मुनगंटीवारांची जळजळीत टीका

Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट आणि भाजपसोबत गेले. त्यानंतर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. या फुटीनंतर आजपासून शरद पवार (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा सुरू झाला. आज पवारांनी येवल्यात सभा घेतली. या सभेत बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावरून आता भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शरद पवारांवर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. पवारांचा दौरा फुसका होईल, आता जे उरलेले नेते आहेत, ते देखील टाटा-बायबाय करतील, असं म्हणाले. (Sudhir Mungantiwar On NCP leader Sharad Pawar tour)

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

अजित पवारांच्या बंडाला राष्ट्रवादीचे अनेक नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला जबाबदार धरतात. आज राष्ट्रवादीची सभा झालाी. या सभेतूनही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भापजवर टीकास्त्र डागलं. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शरद पवारांच्या दौऱ्याविषयी विचारले असता ते म्हणाले, बुदसे गयी वो हौदसे नही आती. पवारांनी जेव्हा भाकरी फिरवली पाहिजे, असं म्हटलं तेव्हाच भाकरी फिरवली असती तर ही वेळी आली नसती. योग्य वेळी भाकरी फिरवली असती, आणि २०१४ पासून कहीं पे निगाहें कहीं पे निशाना न करता जे ठरलं ते केल असतं, तर कार्यकर्ते आणि सहकार्याचा विश्वास राहिला असता. मला तर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांबद्दल प्रचंड सहानुभूती वाटते. भाजपवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतःचंही आत्मचिंतन करायला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

माझा अंदाज चुकला, पुन्हा चुक करणार नाही; शरद पवारांनी येवलेकरांची मागितली माफी 

ते म्हणाले, जर तुमच्या स्वभावामध्ये संघटन कौशल्य असते, लोकांना टिकवून ठेवण्याची क्षमता असती तर पक्षात फुट पडली नसती. आता पक्षात फुट पडल्यानंतर ते भाजपला दोष देतात. भाजप देशाच्या हिताचं, देशाच्या विकासाचं राजकारण करते. भाजपवर टीका केली जाते. पण, टिका कोण करतं, तर ज्यांनी वसंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. राजीव गांधींचा ज्यांनी अपमान केला, त्यांनी आमच्यावर टीका करून आम्हाला शहाणपण सांगाव? बीज बोए बहुल के तो आम कहा से आए? आता दौरे करून शरद पवार संघटन करूच शकत नाही. कारण, लोकांच्या लक्षात आलं की, पवारांना देशाचं काही देणंघेणं नाही. पवारांचा दौरा फुसका दौरा होईल. कारणं, त्यांचं राजकारण फक्त मोदी विरोधापुरतचं आहे. पवारांनी देशासाठी काय केलं, हे एकदा सांगावं, असा सवाल करत अजून काही लोक संपर्कात आहे, ते लोकंही आता टाटा बाय-बाय करतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

 

Tags

follow us