Sudhir Mungantiwar On Sharad Pawar: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क येथील भव्य सभेने झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेत्यांनी भाजपा (BJP) आणि केंद्रावर टीका केली. मात्र आता भाजपचे सर्वच नेते त्याचा वचपा काढत असल्याचे दिसत आहे.
मीडियाशी बोलताना, भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना तिखट शब्दांत सुनावले आहे. म्हणाले की, शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं. चले जाव म्हणतात म्हणजे पुन्हा पार्लमेंटमध्ये, सत्तेत जाओ. अशा तिखट शब्दात भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना सुनावले आहे.
पुढे म्हणाले की, कौतुक करण्यासाठी काय त्यांच्याकडे दिव्यदृष्टी आहे? भाजपावर टीका करून त्यांना मतदान असेल असं त्यांना वाटतं, मोदी हे आपल्या भाषणात केलेल्या विकासावर बोलतात. रस्ते, गरिबांसाठी अनेक योजना, रस्ते निर्मिती, सर्वांगीण विकास हा त्यांना दिसला नाही. त्यांना अल्झायमर झालाय, असे यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा धोका ओळखला होता. तमाम हिंदू बांधव भगिनींनो असं बाळासाहेब म्हणायचे. त्याच बाळासाहेबांच्या मुलाला हा उल्लेख सोडावा लागला. असा टोला भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लगावला. मी ऑनलाइन गेमिंग किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या विरोधात आहे. 2006 मध्ये काँग्रेस काळात हा मोठा घोटाळा झाला. कंपन्यांचे खोटे पट्टे होते. आम्हीच CBI चौकशीची मागणी केली. फ्युचर गेमिंग कंपनी यात नव्हती.
Sangharshayoddha: मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका
पुढे म्हणाले की, तिसरी यादी येत्या 20 मार्चच्या आत घोषित होईल. महायुतीतील घटक पक्षांनी आापल्या जागा जवळपास निश्चीत केल्या आहेत. EVM काँग्रेसने आणला आणि त्यावर संशय व्यक्त करतात. याचा अर्थ स्वतःला दोष देणे, हरले की EVM वर ठपका ठेवायचा. मला यांची कीव येते. हे राज्याचा विकास, देशाची प्रगती हे करू शकत नाही. प्रभू राम मान्य नाही म्हणतात आणि यांचा एक खासदार रामनवमीला सुट्टी मागतो. असे यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.