Download App

‘आज तुझा मर्डर फिक्स…’ भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, नांदगावमध्ये मोठा राडा

  • Written By: Last Updated:

Suhas Kande Threatened To Kill Sameer Bhujbal In Nandgaon : नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये (Assembly Election 2024) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटामध्ये आज जोरदार राडा झालाय. समीर भुजबळांनी सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना अडवलं. त्यानंतर सुहास कांदे घटनास्थळी आले. त्यांनी समीर भुजबळांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराने सुहास कांदे संतापले होते. त्यांनी समीज भुजबळ यांना ‘आज तुझा मर्डर फिक्स आहे’, अशी धमकी दिलीय. या राड्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नांदगावमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मोठा राडा झालाय. समीर भुजबळ अन् सुहास कांदेंचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. हा राडा नांदगाव मनमान रस्त्यावर झालाय. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असं म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी दिलीय. त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशीच नांदगावमध्ये वातावरण तापलेलं आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.

निवडणुकीत बिटकॉईनचा गैरवापर केल्याचा आरोप; सुप्रिया सुळेंचा संताप, मानहानीचा खटला दाखल करणार

समीर भुजबळ यांनी अडवून ठेवलेले मतदार संतापले होते. “आमचा वेळ वाया घालवू नका, मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचं आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नसून मतदार संघातीलच आहोत. जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असा संताप मतदारांनी व्यक्त केलाय.

अजित पवार मुख्यमंत्री होणार? जय पवारांनी थेट सांगितलं, बारामतीकर….

या प्रकारानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ते म्हणाले की, मुद्दा दोन्ही उमेदवार समोर आले हा नसून कांदेंच्या व्यक्तीची ही शाळा आहे. हजार लोक तिथे आणुन ठेवला होता. त्यानंतर सचिन मानकर हिस्ट्री शुटर पिस्तुल घेवून आला. समीरला मारून टाकेल अशी धमकी दिली, असा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. पोलिसांनी त्याला गाडीत बसवून सोडून दिलं. पोलीसच असं वागले तर कसे चालेलं असा सवाल भुजबळांनी विचारला आहे. याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असेल. या प्रकारची दादागिरी चालू असेल तर आम्ही तयार आहोत, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिलाय.

 

follow us