Download App

मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान

Suhas Kande’s open challenge to five former MLAs including Bhujabal : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बाजार समितीच्या (Nandgaon Market Committee) निवडणुकीसाठी काल मतदान झाले होते. त्या मतदानानंतर लगेच मतमोजणी सुरू झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात थेट लढत होती. सुरवातीच्या निकालात कांदे गटाने 15 जागांवर आघाडी घेतली. तर एक अपक्ष आणि मविआला फक्त 2 जागा मिळाल्या. दरम्यान, कांदे यांनी छगन भुजबळासंह (Chhagan Bhujbal) पाच माजी आमदारांना थेट आव्हान दिलं. मी कधीही पाच माजी आमदारांना घाबरत नाही. त्यांनी माझ्यासमोर यावं, मी पुन्हा निवडणूक लढवायला तयार आहे, असं कांदे म्हणाले.

मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत 5 माजी आमदारांचं महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल आणि कांदे यांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल उभं होतं. या दोन पॅनलमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार होती. त्यामुळं अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत कांदे आणि छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशातच या निवडणुकीच्या निकालपूर्वी काल सुहास कांदे यांनी छगन भुजबळांसह माजी आमदारांवर टीका केली आहे. मी कधीही पाच माजी आमदारांना घाबरत नाही. त्यांनी यावं, माझ्यासमोर उभं राहावं. मी पुन्हा निवडणूक लढवायला तयार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्री शिंदेंचे अभिवादन

खरंतर छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील संघर्ष हा काही नवा नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही नाशिकमधील भुजबळ- कांदे यांच्यातला वाद अनेकदा चव्हाट्यावर आला होता. आता पुन्हा एकदा कांदेंनी थेट आव्हान देत भुजबळांना डिवचलं आहे. कांदे म्हणाले, मतदारांवार माझा विश्वास आहे. मतदार हे विकासाला मतदान करणारे आहेत. त्यामुळं माझेच उमदेवार निवडून येतील, असा विश्वास कांदेंनी व्यक्त केला. आम्ही विकासाच्या मागे धावतो. आम्ही सुखदुखात धावून जाणारे आहोत. ते फक्त निवडुकीला मतदान मागतात, असंही कांदे म्हणाले.

भुजबळ आणि कांदे या दोघांमध्ये सतत शाब्दिक चकमक होत असतते. या दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्याचे दिसून आले. तर आता सुहास कांदे यांनी भुजबळांना थेट आव्हान दिल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर आता भुजबळ हे कांदेच्या आव्हानावर काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us