Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आघाडी, महायुतीकडून इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. या जागेसाठी पुन्हा एकदा आरपीआयकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दावा सांगितला आहे. तसेच आठवले यांचे शिर्डी दौरेही वाढू लागले आहे. यावर आता खासदार डॉ. सुजय विखे यांनी परखड भाष्य केले आहे. रामदास आठवले यांना उमेदवारीसाठी पाठिंबा देणार का या प्रश्वावर विखे यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे.
अजितदादा आमचे नेते आहेत असं म्हणालोच नाही; पवारांचं काही तासातचं घुमजाव
नगरमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी माध्यमांशी बोलताना खासदार विखे म्हणाले, जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल. त्याचा प्रचार आम्ही करू. आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जो आदेश देतील तोच खासदार होईल. जे कोणी उमेदवार या जागेसाठी इच्छुक असतील त्यांनी आपली इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त करावी. त्यांनतर मोदी यांचा जो काही आदेश येईल, तो आमच्यासाठी अंतिम असेल. त्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करू, असे यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले.
‘राष्ट्रवादीत फूटच, दोन दगडांवर पाय….; पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले
2009 मध्ये रामदास आठवले हे आघाडीकडून या मतदारसंघात मैदानात उतरले होते. परंतु शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरच नाराजी व्यक्त केली होती. रामदास आठवले यांनी आता पुन्हा या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तसेच या मतदारसंघाचे दौरे त्यांनी वाढविले आहेत. येथून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. ते शिंदे गटात आहे. त्यांना डावलून भाजप आठवलेंना जागा देणार का ? हाही मोठा राजकीय पेच आहे.