Download App

वेळ बदलली असली तरी घड्याळ तेच…सुनेत्रा पवार म्हणाल्या घड्याळाला मत म्हणजे…

  • Written By: Last Updated:

Sunetra Pawar file Lok Sabha Nomination : देशामध्ये मोदींच्या कामाची आणि बारामतीमध्ये अजित दादांच्या कामाची सर्वांना महती माहिती आहे असं म्हणत बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पंतप्रधानांसह अजित पवारांची चांगलीच स्तुती केली. त्या आयोजित सभेत बोलत होत्या. (Devendra Fadanvis) यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) भाजपा नेते चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, पुण्याचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

 

मोदींच्या काळातच विकास झाला

यावेळी पुढे बोलताना, सुनेत्रा पवार म्हणाल्या आता वेळ जरी बदललेली असली तरी आपल घड्याळ तेच आहे. त्यामुळे घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी यावेळी आपण नक्की विजय मिळवू असा विश्वासही व्यक्त केला. गेली अनेक दिवसांपासून जो विकास व्हायला हवा तो झाला नाही. मात्र, मोदींच्या काळात काय विकास झाला आणि किती विकास झाला हे आपल्याला माहिती आहे असंह सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

 

दादांची काम करण्याची उर्जा

देशभरात विकास होताना आपण पाहिला आहे. आपण बारामतीचा विचार केला तर लक्षात येईल अजित दादांनी किती काम केलं आहे. त्यांनी जर कुठल्या कामाचा ध्यास घेतला तर ते काम पूर्ण कारायचंच अशी त्यांची कामाची पद्धत आहे. तसंच, त्यांच्या कामासोबतच त्यांची मोठी उर्जा आहे. त्यामुळे न थकता ते सातत्याने जनतेसाठी काम करत असतात अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी अजित दादांची स्तुती केली.

 

पवार विरूद्ध पवार

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा हा सामना होत आहे. गेली अनेक दिवसांपासून या मतदार संघात महायुतीचा कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, पवार कुटुंबातील अनेक व्यक्तिंनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचं दिसलं. तसंच, ही काय भावकिची निवडणूक नाही असं म्हणत अजित पवारांनीही पलटवार केले आहेत. बारामती या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे.

follow us