Deputy CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झालीय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सूत्र हे त्यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे आले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज शपथ घेतलीय. अजित पवार यांच्या नावावर सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम आहे. तर सातव्यांदा त्यांच्यात घरात उपमुख्यमंत्रीपद गेलंय. सुनेत्रा पवार यांच्यामुळे एक इतिहास घडत आहे. तो इतिहास आहे त्या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर त्या देशातील आठव्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवारांसह तीन राज्यात महिला उपमुख्यमंत्री आहेत.
जमुना देवी देशातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
काँग्रेसच्या जमुना देवी मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री राहिल्या आहेत. 1998 ते 2003 अशा तब्बल पाच वर्ष त्या उपमुख्यमंत्री होत्या. तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे मुख्यमंत्री होते. जमुना देवी या 1952 ते 1957 या कालावधीत मध्य भारत राज्याच्या पहिल्या विधानसभा सदस्य होत्या. त्यानंतर 1962 ते 1967 या कालसावधीत झाबुओ लोकसभा मतदारसंघ आताच्या रतलाम लोकसभा मतदार संघातून त्या खासदार झाल्या होत्या. तसेच त्या 1978 ते 1981 पर्यंत त्या राज्यसभा सदस्या होत्या. अर्जुन सिंग, मोतीलाल व्होरा आणि श्यामा चरण शुक्ला यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाचे काम सांभाळले. 1998 ला दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाल्या. 1998 मध्ये त्यांना मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याच भारताच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या होत्या. काँग्रेसचे सरकार गेल्यानंतचर 2003 पासून ते 2010 पर्यंत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. 2010 मध्येच कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
कमला बेनीवाल
काँग्रेसच्या कमला बेनीवाल 2003 मध्ये राजस्थानच्या उपमुख्यमंत्री होत्या. त्या 317 दिवस उपमुख्यमंत्री पदावर होत्या. अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री असताना त्या उपमुख्यमंत्री होत्या.
राजिंदर कौर भट्टल
काँग्रेसच्या राजिंदर कौर भट्टल या पंजाबच्या उपमुख्यमंत्री राहिल्या आहेत. 2004 ते 2007 या कालावधीत त्या या पदावर होत्या. कॅप्टन अमरिंदर सिंग हे तेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री होते.
पमुला पुष्पा श्रीवानी
पमुला पुष्पा श्रीवानी या आंध्र प्रदेशच्या तीन वर्षे उपमुख्यमंत्री राहिल्या आहेत. 2019 ते 2022 या कालावधीत त्या या पदावर होत्या. वायएसआर काँग्रेसेचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्या मंत्रिपदावर होत्या.
रेणू देवी
भाजपच्या रेणू देवी या 2020 ते 2022 या कालावधीत बिहारच्या उपमुख्यमंत्री राहिल्या आहेत. जेडीयूचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या काळात त्या या पदावर राहिलेल्या आहेत. त्या संघ परिवाराशी निगडीत होत्या. 2005 ते 2009 या दरम्यान त्या बिहारच्या क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री होत्या. तर 2014 ते 2020 या दरम्यान त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा होत्या. त्यानंतर त्या बिहारच्या एनडीए सरकारमध्ये, त्या उपमुख्यमंत्री होत्या. त्या देशातील पाचव्या महिला उपमुख्यमंत्री होत्या.
राजघराण्यातील दिया कुमारी
भाजप पक्षाच्या दिया कुमारी सध्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात त्या मंत्री आहेत. त्या जयपूरमधील कछवाहा परिवारातील आहे. त्या जयपूरचे राजघराणे महाराजा मानसिंह यांची नात आहे. दिया कुमारे यांचे वडिल भवानी सिंह हे भारतीय सेनेते अधिकारी होते. 2019 ला त्या लोकसभेत निवडून गेल्या होत्या. त्यानंतर त्या विधानसभेच्या निवडणूक लढल्या आहेत.
प्रवती परिदा
भाजपच्या प्रविता परिदा या ओडिशाच्या उपमुख्यमंत्री आहेत. मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात त्या असून, महिला व बालविकास, मिशन शक्ती आणि पर्यटन खात्याच्या त्या मंत्री आहेत.
सुनेत्रा पवार आठव्या उपमुख्यमंत्री
आता उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतलीय. त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. तर देशातील आठव्या महिला उपमुख्यमंत्री आहेत.
देशात 18 महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. तर दोन महिला मुख्यमंत्री सध्या पदावर आहेत. भाजपच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या गेल्या पंधरा वर्षापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत.
