ADCC Bank Election: सभापती राम शिंदेंनी विखेंविरोधात मोट बांधली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही मदतीला ?

Ahilyanagar DCC Bank Election-शिंदे यांनी सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींचा धडाका सुरू केलाय. उत्तर जिल्ह्यातील बड्या नेत्यांची भेट.

  • Written By: Published:
Ram Shinde

Ahilyanagar DCC Bank Election: अहिल्यानगरमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच (Ahilyanagar DCC Bank Election) होणार आहे. राजकीय हालचाली देखील सुरु असल्याचे नेतेमंडळीच्या बैठकांतून स्पष्ट होतंय. यातच नगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांची भेट घेतली. एकीकडे हे सगळं सुरु असताना अचानक राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची अचानक शासकीय विश्रामगृह येथे एंट्री झाली. तातडीने शिंदे यांच्यासह आमदार जगताप यांनी पवार यांची भेट घेतली. याभेटीदरम्यान जिल्हा बँक निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांच्यासह जगताप यांनी दिली.

खरंतर सहकाराचा जिल्हा म्हणून अहिल्यानगरची राज्यात एक वेगळी ओळख आहे. यातच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक ही आगामी काळात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या निवडुकीबाबत राम शिंदे यांनी चांगलाच रस दाखवला आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र त्यांच्याकडून सुरु असल्याने यागोष्टीला दुजोरा मिळत आहे. नुकतेच शिंदे यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

सिस्पे घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल काळोखेला इंटरपोलमार्फत फिजीमध्ये अटक; पीडितांच्या न्यायाच्या लढ्याला बळ

शिंदे यांनी सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींचा धडाका सुरू केलाय. उत्तर नगर जिल्ह्यातील बड्या नेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील वजनदार नेत्यांकडे वळवला आहे. नुकतेच त्यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्यासह आज माजी आमदार भानुदास मुरकुटे व शिष्टमंडळ, तसेच पांडूरंग अंभग व त्यांचे समर्थक यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी अचानक उपमुख्यमंत्री पवार यांची एंट्री झाली व या चर्चा घेऊन पवार यांच्यासोबत देखील बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.


‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनावर येणार चित्रपट; 20 कोटींचं बजेट, नावही ठरलं….


विखे-शिंदे शीतयुद्ध सुरूच

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीवरून पुन्हा एकदा राम शिंदे व राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये शाब्दिक शीतयुद्ध पाहायला मिळाले. भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विविध सहकारी संस्थांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहे. यावर मंत्री विखे यांनी भाष्य केले. ते म्हणाले , कोण कोणाला भेटत आहे याने फारसा फरक पडत नाही.


बिनविरोध निवडणुकीची शक्यता

सहकार क्षेत्रातील निवडणुका या नेहमीच संघर्ष टाळून बिनविरोध देखील होऊ शकतात, असे सूचक वक्तव्य विखे यांनी केले. तर भेटीगाठी घेणे चुकीचे नाही. कारण हे प्रगल्भ राजकारणाचे लक्ष आहे, तसेच सहकारमध्ये तर भेट घेतलीच पाहिजे कारण सहकार शिवाय नाही उद्धार अशा शब्दात शिंदे यांनी देखील विखेंच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले.

follow us