सोमेश्वरचा रणसंग्राम ! सुनेत्रा पवारांना बॅकफूटवर आणण्यासाठी नातवांच्या अडून शरद पवारांचा डाव ?

Someshwar Election: सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सध्या सत्ता आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवारांनी हा कारखाना आता आपल्या ताब्यात ठेवला होता.

Someshwar Election

Someshwar Election

Someshwar Election 2026 : तुमच्या भागातील साखर कारखाना ऊसाला किती भाव देतो ? काही कारखाने तीन हजार, 3 हजार 200 असा भाव देतोय. पण महाराष्ट्रात असा एक कारखाना आहे. तो सर्वाधिक 3800 रुपये प्रतिटन भाव देतोय. म्हणजेच एफआरपीपेक्षा तब्बल पाचशे रुपये अधिक. असा भाव देणारा कारखाना खासगी नाही तर सहकारी आहे. त्या कारखान्याचे नाव आहे बारामतीमधील सोमेश्वर. हाच तो कारखाना अजित पवार यांनी भरभराटीला आणलेला. आता अजितदादा आपल्यात नाही. त्यानंतर या कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक लागलीय. हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटणार आहे. त्याबाबत जाणून घेऊया…


ब्रिक्सच्या 18व्या शिखर परिषदेत भारताचा मोठा विजय; न्यू दिल्ली डिक्लेरेशनला सर्वसंमती, मोदींचे 10 प्रस्ताव मंजूर

सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सध्या सत्ता आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवारांनी हा कारखाना आता आपल्या ताब्यात ठेवला होता. हा कारखाना प्रचंड आर्थिक तोट्यात होता. तो कारखाना कर्जातून बाहेर काढण्याचा शब्द अजितदादांनी सभासदांना दिला होता आणि तो खराही करून दाखविला होता. आता सोमेश्वर साखर कारखान्यासाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 12 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध शरद पवारांचा पॅनल असा संघर्ष होणार आहे. म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस असणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) व आमदार रोहित पवार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करून राजकीय खळबळ उडून दिलीय. तर दुसरीकडे पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनीही पॅनेल उभा करण्याचा निर्णय घेतलाय. तर भाजपचे नेते संजय जगताप यांनी पॅनेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारखान्यासाठी चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. परंतु खरी लढत दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच पवार विरुद्ध पवार अशीच राहणार आहे.


Video : आम्हीही तक्रार करणार! आंदोलन बंद पाडण्यासाठी ED’ची नोटिस; जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

कारखान्यावर अनेक राजकीय सूत्र
काकडे कुटुंबातील शहाजी काकडे, सतीश काकडे यांना राष्ट्रवादीकडे सक्रिय करून पवार कुटुंबाचे मनोमिलन घडवल्याने सोमेश्वर कारखाना परिसरातील जिल्हा परिषद गटात आपली सत्ता मजबूत करण्यात अजितदादांना यश आले होते. काकडे कुटुंबाबरोबरचे राजकीय वाद मिटल्याने सोमेश्वर कारखान्याच्या यापूर्वीच्या दोन पंचवार्षिक निवडणुका एकतर्फी जिंकण्यात अजितदादांना यश आले होते. मात्र आता याच कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वर्चस्वाला शरद पवार गट आव्हान देत आहे.

कारखान्याचे कार्यक्षेत्र अनेक तालुक्यात
सोमेश्वर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र केवळ बारामती तालुक्यापुरते मर्यादीत नाहीत. बारामतीसह पुरंदर व सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात आहे. त्यामुळे तेथील राजकारणाशी हा कारखाना संबंधित आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मांडकी-जवळार्जुन गटात 6,248, होळ-मोरगावमध्ये 5,556, निबुत-खंडाळामध्ये 5,524, कोराळे-सुपामध्ये 5,503 आणि मुरूम-वाल्हा गटात 47795 मतदार आहेत. त्यामुळे मांडकी-जवळार्जुन हा सर्वाधिक मतदारांचा गट आहेत. या गटातील कौल निकालाची दिशा बदलू शकतो. या गटामधून 21 संचालक निवडणू दिले जातात.

पवार विरुद्ध पवार संघर्ष आता सहकारात
पवार घरातील राजकीय संघर्ष आता या कारखान्याच्या निवडणुकीतून दिसून आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकले झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा संघर्ष झाला होता. लोकसभेत सुनेत्रा पवारांना पराभूत करून शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतरचा विधानसभेत अजितदादांनी पुतण्या युगेंद्र पवारांचा मोठा मतांनी पराभव केला होता. त्यानंतर बारामती नगरपालिकाही अजितदादांनी ताब्यात घेतली होती. परंतु झेडपी आणि पंचायत समितीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते. पण याच निवडणुकीच्या धामधुमीत अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार एकतर्फी विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात शरद पवारांनी उमेदवारी दिली नव्हती. परंतु सोमेश्वरच्या निवडणुकीत मात्र पवार विरुध्द पवार असा राजकीय संघर्ष होणार आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पॅनेलला पराभव करून कारखाना ताब्यात घेणे आणि सुनेत्रा पवारांची राजकीय ताकद कमी करण्याचा डाव हा शरद पवार गटाचा असणार आहे. कारण एक कारखाना ताब्यातून गेल्यानंतर भविष्यात बारामती विधानसभेचे गणित पक्के करण्याचा डाव शरद पवार गटाचा असणार हे नक्की.

Exit mobile version