Download App

‘विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढणार, बारामतीसारखाच…’ उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांची प्रतिकिया

  • Written By: Last Updated:

Sunetra Pawar’s reaction after announcement of candidature : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झालं. सुनील तटकरेंनी काहीच वेळापूर्वी सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीनेही आज बारामतीसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले.

…तर राहुल गांधींसाठी संपूर्ण थिएटर बुक करेल; स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिल्यावर फडणवीसांचा टोमणा 

सुनील तटकरेंनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस आहे. कारण आज मला महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर या सर्वांचेच आभार मानते, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! अमरावतीतून आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात 

विकासाचा मुद्दा घेवून आपण निवडणुक लढणार असून बारामतीप्रमाणेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यावर आपला भर असेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

शिवतारेंची बंडाची तलवार म्यान
दरम्यान, शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या रुपाने महायुतीत बंडाळी निर्माण झाली होती. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपण सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याचे घोषणा केली.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुध्द भावजय अशी लढत होणार असून ही एकप्रकारे शरद पवार विरुध्द अजित पवार अशीच लढत आहे. त्यामुळं अजित पवारांना ही जागा राखण्यात यश येणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us