‘महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नाही’; सुनिल शेळकेंनी सांगितलं खरं

Sunil Shelke On Rohit Pawar : महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा सत्तेत जाण्यासाठी रोहित पवारांनीही (Rohit Pawar) सह्या केल्या होत्या पण महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नसल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळकेंनी (Sunil Shelke) केला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेळकेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राकडे पाठपुरावा […]

Sunil Shelke

Sunil Shelke

Sunil Shelke On Rohit Pawar : महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा सत्तेत जाण्यासाठी रोहित पवारांनीही (Rohit Pawar) सह्या केल्या होत्या पण महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नसल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळकेंनी (Sunil Shelke) केला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेळकेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार; अजित पवारांचा ग्वाही

सुनिल शेळके म्हणाले, 20 जुलै 2022 ला मविआचं सरकार कोसळतंय हे लक्षात आल्यानंतर 22 जुलैला दादांच्या दालनात सर्वपक्षीय प्रमुख तत्कालीन मंत्री 45 ते 47 आमदार उपस्थित होते. त्यावेळी सर्वांनी निर्णय घेतला की, दादा आपल्याला सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेव्हा स्वत:हून नेत्यांनी सह्या करुन दादांच्या हाती पत्र दिलं. तेव्हा माझ्यासमोर रोहित पवारांनी दादांना पत्र सही करुन दिलं असल्याचं सुनिल शेळकेंनी सांगितलं आहे.

अजितदादांनी भूमिका घेतली की, साहेबांची तुम्ही परवानगी घेऊन आपण निर्णय घेऊ. त्यावेळी रोहित दादांच्या नेतृत्वात आम्ही साहेबांना भेटायला गेलो. साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे नकार दिला.
त्यानंतर दादांना विरोधी पक्षनेते करण्याचं ठरलं. आम्ही सर्व आमदारांनी सह्या करुन पत्र दिलं . त्यावेळी आम्ही 30 ते 32 आमदारांनी सह्या केल्या होत्या. सत्तेत जाण्यासाठी 52 आमदारांनी सह्या केल्या होत्या. सत्तेत जायचं म्हणून 22 जूनला सह्या घेतल्या तर 1 जुलैला विरोधी पक्षनेत्याच्या सह्या वाय.बी सेंटरला घेतल्या होत्या. महायुतीत जेव्हा आम्ही गेलो तेव्हा रोहित पवारांना विचारलंही नसल्याचं सुनिल शेळकेंनी सांगितलं आहे.

‘मासिक पाळी अपंगत्व नाही, त्यासाठी पगारी सुट्टीची गरज नाही’; स्मृती इराणींनी आळवला विरोधाचा सूर

अजितदादांनी माझ्यासारख्या आमदारांना खूप मदत केली आहे. रोहित पवारांनाही कर्जत-जामखेड मतदारसंघात दादांनी मदत केली आहे. ताकद दिली, विकासकामांसाठी भरघोस निधी दिला पण रोहित पवार स्वत:च्या काकाचे होऊ शकत नाही ते सर्वसामान्यांचे आणि आमतचे काय होतील, या प्रक्रियेत सत्य परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर जयंत पाटलांना विचारा, असंही सुनिल शेळके म्हणाले आहेत.

राज्यात स्वयंघोषित संघर्षयोद्धा म्हणून युवा संघर्ष यात्रा उभी केली. अशा रोहित पवारांना दादांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सध्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे. दरम्यान, सत्तेत जाण्यासाठी रोहित पवार यांनी अजितदादांना सह्या करुन दिल्या होत्या. त्यामुळे आता रोहित पवारांना त्यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही उगाचच खोट्या वल्गना करुन नका, त्या थांबवा आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचा खोचक सल्ला सुनिल शेळकेंनी रोहित पवारांना दिला आहे.

Exit mobile version