Download App

Sunil Tatkare : राष्ट्रवादीत फूट पडली का ? खासदार सुनील तटकरेंचे थेट उत्तर…

Image Credit: letsupp

Sunil Tatkare : सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, सगळी वैज्ञानिक कायदेशीर बाबी तपासून आम्ही राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही पीटीशन दाखल केलेली आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुका आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही घड्याळ्याच्याच निशाणीखाली आम्ही लढू. तसेच मला विश्वास आहे. आमच्या निर्णयावर गुणवत्तेवर निवडणूक आयोग शिक्का मोर्तब करेल. अशा शब्दात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत फूट पडली का? यावर उत्तर दिलं.

फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता; CM शिंदेंनी उघडं पाडलं MVA चं पितळं

काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले,2 जुलैला अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून सामुहिक निर्णय घेत देशात एनडीए आणि राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात अजित पवार उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आमच्या भूमिकेची पार्श्वभूमी अजितदादांनी स्पष्ट केली. आमची मूळ विचारधारा धर्मनिरपेक्ष आणि शाहू फुले आंबेडकर यांची आहे. पण देशाला मोदींच्या नेतृत्वाची गरज असल्याने आम्ही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा निर्णय घेतला.

अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा; संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

पुढे तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वात जनतेसमोर आम्ही जात आहेत. त्यात आम्ही राज्यातील जनतेच्या समोर पहिल्यांदाच येणार आहोत. त्यासाठी बीडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही उत्तरदायित्व सभा असणार आहे. या सभेत आम्ही आमच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देणार आहोत. त्यानंतर राज्याव्यापी दौरा देखील करण्यात येणार आहे. असं यावेळी तटकरे म्हणाले.

पवार साहेबांकडे माझं (Sunil Tatkare) बोट असण्याचं कारण नाही. कारण ते सहा दशकं ते महाराष्ट्रचं नेतृत्व करतात. मात्र काही पक्ष संभ्रमाचं वातावरण काही पक्ष निर्माण करतात. तसेच पवार साहेब जे बोलले त्यांच्या आणि अजित पवारांच्या ज्या गाठीभेटी झाल्या त्यावर महाविकास आघाडीचे घटक पक्षच तिखट प्रतिक्रिया देत असल्याचं बोललं जात आहे. पण आमच्या मनात संभ्रम नाही आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. पवारांच्या विधानांवर त्यांनाचं विचारा.

राष्ट्रवादीत फूट पडली का? तटकरे म्हणाले…

सगळी वैज्ञानिक कायदेशीर बाबी तपासून आम्ही राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही पीटीशन दाखल केलेली आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुका आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही घड्याळ्याच्याच निशाणीखाली आम्ही लढू. तसेच मला विश्वास आहे. आमच्या निर्णयावर गुणवत्तेवर निवडणूक आयोग शिक्का मोर्तब करेल. अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादीत फूट पडली का? यावर उत्तर दिलं.

Tags

follow us

वेब स्टोरीज