अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा; संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा; संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने गद्दार, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या जातात. त्यावरुन शिंदे गटावर टीका केली जाते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यांच्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट पडले. मात्र शरद पवार गटाकडून अजितदादांना कोणी गद्दार म्हटलेलं नाही, त्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा, आहे का हिंमत असे म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पैसेच नाहीत! मराठवाड्यातील भाजप आमदाराने परत केले म्हाडाचे घर

गद्दारांना उत्तर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची सभा होणार आहे, असा प्रश्न विचारला असता त्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, गद्दारांना उत्तर देणार, पन्नास खोके एकदम ओके असं म्हणता, अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा, आहे का हिंमत? ताकद आहे का? तुम्ही केलेली गद्दारी महाराष्ट्राने पाहिली, त्यामुळे शिवसेना प्रमुखांनी उभ्या केलेल्या संघटनेचं वाटोळं तुम्ही केलं. स्वतःचं घर भरण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांनी विकले ते आमच्याविरोधात बोलणार का? असा सवालही यावेळी आमदार शिरसाट यांनी उपस्थित केला.

Govardhan Asrani: पुण्याच्या FTII ची इंदिरा गांधींकडे तक्रार; वाचा अभिनेते गोवर्धन असरानींचा किस्सा

टीझर आम्ही देखील पाहिला, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, तरिदेखील तुम्ही माझ्यासोबत आहेत. अडीच वर्ष होतं तेव्हा काय दिलं? जेव्हा देण्यासारखं होतं तेव्हा दिलं नाही आता नसल्यावर काय देणार अशीही टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्यामुळे आता असे टिझर प्रदर्शित करुन लोकांच्या मनावर काही परिणाम होणार नाही असेही यावेळी शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत हे खरं आहे पण पैसा नाही असं म्हणण्याची हिंमत माझ्यासारखा कार्यकर्ता करु शकत नाही, कारण त्यांच्याकडे काय काय आहे, हे आम्हाला माहित आहे. हे आमचं विधान किती खरं किती खोटं? हे काही दिवसानंतर सर्वांना कळेल असंही यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube