Govardhan Asrani: पुण्याच्या FTII ची इंदिरा गांधींकडे तक्रार; वाचा अभिनेते गोवर्धन असरानींचा किस्सा

Govardhan Asrani: पुण्याच्या FTII ची इंदिरा गांधींकडे तक्रार; वाचा अभिनेते गोवर्धन असरानींचा किस्सा

Govardhan Asrani: नुकताच प्रदर्शित झालेला ‘ड्रिम गर्ल २’ (Dream Girl 2) मध्ये गोवर्धन असरानी युसूफ अली सलीम खान देखील मुख्य भूमिका करत आहेत. बॉलिवूड (Bollywood) अभिनेते असरानी यांनी अनेक हटक्या सिनेमातून एक अनोखी ओळख निर्माण केल्याचे दिसत आहे. त्यांनी अनेक सिनेमे आणि सिरीयल केले आहेत. गेल्या काही दशकांपासून ते इंडस्ट्रीत कायम अॅक्टिव्ह असल्याचे बघायला मिळते. ३५० पेक्षा जास्त सिनेमात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारले आहेत.

बिग बी (Amitabh Bachchan) पासून ते राजेश खन्ना आणि आजच्या पिढीतील काही कलाकारांबरोबर ते काम करत असल्याचे दिसतात. १ जानेवारी १९४० मध्ये असरानी यांचा जन्म झाला. ते ८३ वर्षांचे आहेत. जयपूरच्या सिंधी कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्याच्या वडिलांचं दुकान होते. असरानी यांना वडिलांच्या व्यवसायामध्ये आजिबात रस वाटत नव्हता. त्यांनी जयपूरमध्ये शिक्षण पूर्ण करताना ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केले होते. असरानी यांनी बॉलिवूड अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी लग्न केले.

‘आज की ताजा खबर’ आणि ‘नमक हराम’ या सिनेमाच्या दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे सांगितले जात आहे. लग्नानंतर देखील या दोघांनी अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केल्याचे बघायला मिळाले आहे. ‘आज की ताजा खबर’या सिनेमासाठी असरानी यांना फिल्मफेयर अवॉर्ड देखील देण्यात आला होता. असरानी आणि मंजू याना एक मुलगा आहे, तो अहमदाबाद तो दातांचा डॉक्टर आहे.

Dream Girl 2: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ची बॉक्स ऑफिसवर जादू; कमावले इतके कोटी

एका मुलाखतीच्या दरम्यान असरानी यांनी सांगितले आहे की, ते लहान असताना मुंबईमध्ये आले होते. त्यांनी म्युझिक डायरेक्टर नौशाद यांना हुडकण्यासाठी १ महिना मुंबईमध्ये घालवला होता. मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ते मदत करणार असं त्यांना नेहमी वाटत असायचं. परंतु त्यांना मदत मिळाली नाही आणि ते पुन्हा जयपूरला आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पुढे एफटीआयआयमध्ये देखील प्रवेश घेतला होता. एफटीआयआयमध्ये देखील शिक्षण घेतल्यावर पुन्हा २ वर्ष त्यांनी काम मिळवण्यासाठी हिकडे तिकडे फिरत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


आणि त्याच दरम्यान एकदा त्यांनी थेट इंदिरा गांधी पुण्यात आल्या असतानाच त्यांना ते जाऊन भेटले होते. त्या काळात त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यावेळी त्यांनी थेट इंदिरा गांधींकडेच तक्रार केली होती. एफटीआयआयमध्ये सर्टिफिकेट असून देखील कोणी काम देत नसल्यचे त्यांनी सांगितले होते. यानंतर इंदिरा गांधी मुंबईमध्ये आल्या आणि त्यांनी निर्मात्यांकडे असरानी यांना कामावर घेण्यास सांगितले होते. यानंतर ते मनोजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. राजेश खन्ना आणि असरानी नमक हराम’ या सिनेमानंतर अतिशय जिवलग मित्र झाले होतं. तसेच राजेश खन्ना यांनी कॉमेडी भूमिकेसाठी असरानी यांना आपल्या सिनेमामध्ये घ्यावं अशी शिफारस निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


असरानी यांनी १९७२ ते १९९१ पर्यंत एकूण २५ सिनेमांत राजेश खन्नांबरोबर काम केल्याचे बघायला मिळाले आहे. असरानी यांनी १९६६ मध्ये करिअरची सुरुवात केली होती. ‘हम कहां जा रहे हैं’ सिनेमात त्यांनी अनेकदा कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. यानंतर त्यांच्या करिअरचा ग्राफ वाढत गेल्याचे बघायला मिळाले. त्यांनी सिनेमाच नाही, तर काही सीरियलमध्ये आणि आता हॉलिवूडमध्येही काम केले आहे. त्यांनी शोले सिनेमामध्ये जेलरची भूमिका साकारली होती. बालिका वधू सीरियलमध्ये शरत पात्र चाहत्यांना बघायला मिळाले. त्यांनी हॉलिवूड सिनेमा केजेस आणि पंबाजी, गुजराती मनोरंजन क्षेत्रात काम केल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube