Download App

पराकोटीच्या द्वेषाची त्यांना कावीळ, डोक्यावर परिणाम झालेली माणसेचं…; तटकरेंचा आव्हाडांवर हल्लाबोल

व्यक्तिगत पराकोटीच्या द्वेषाची जितेंद्र आव्हाडांनी कावीळ झाली आहे. लाडकी बहिण योजनेवरून अजित पवारांवर टीका करणं टीका करणं, हे योग्य नाही.

  • Written By: Last Updated:

Sunil Tatkare : अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कालच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. मध्य प्रदेशच्या लाडली बेहन योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Scheme) सुरू केली. याच योजनेवरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवारांवर टीक केली होती. त्या टीकेला आता खासदार सुनील तटकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

CBI ची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये छापेमारी, पासपोर्ट सेवा केंद्रातील 32 जणांविरोधात गुन्हे दाखल 

सुनील तटकरेनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. आव्हाड यांनी केलल्या टीकेविषयी विचारलं असता तटकरे म्हणाले,
व्यक्तिगत पराकोटीच्या द्वेषाची त्यांना कावीळ झाली आहे. राज्यातील कोट्यावधी बहिणींसाठी घेतलेला हा निर्णय क्रांतीकारी आहे, हे मानण्याचं सोडून ते व्यक्तिगत टीका करत आहे. यातून त्यांच्या मनाचा कद्रपूणाच दिसून येतो. लाडकी बहिण योजनेवरून अजित पवारांवर टीका करणं टीका करणं, हे योग्य नाही. टीका करणाऱ्यांच्या बुध्दीची कीव येते. डोक्यावर परिणाम झालेली माणसेचं असं बोलू शकतात, असा टोला तटकरेंनी लगावला.

पुण्यातील अनधिकृत पब, बार अन् हॉटेल्सवर बुलडोजर; सीएम शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये… 

विरोधी बाकावरील आमदारांना अजित पवारांकडून डावलल्या जात आहे. मी त्यांना 50 पत्र पाठवली मात्र त्यांच्याकडून एकाही पत्राला उत्तर आलं नाही, असा दावा आव्हाडांनी केला. त्याविषयी विचारलं असता तटकरे म्हणाले, अजितदादाच त्याचं उत्तर देऊ शकतील. विठ्ठलाची ओढ जशी वारकऱ्यांना लागते, तशी आव्हाडांना दादांची भेटीची आस का लागली? यावर मी काय बोलणार, असं तटकरे म्हणाले.

आव्हाडांची टीका काय?
भाजपच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली. पण गेल्या चार महिन्यात स्वत:च्या लाडक्या बहिणीला त्यांनी किती छळलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. हा अर्थसंकल्प फसवा आहे. कारण, मूल्यांकन आणि सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत, असे त्यांनीच अर्थसंकल्पात लिहिले आहे. याचा अर्थ हा अर्थसंकल्प मूल्यमापन न करता, सुसूत्रिकरण न करता आणला आहे, अशी टीका आव्हाडांनी केली.

follow us

वेब स्टोरीज