Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. आणि त्यांना खातेवाटपही झालं. अजित पवार गटामुळं आपले मंत्रिपदे गेल्याची भावना शिंदे गटांच्या आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही (Eknath Shinde) आपलं मंत्रिपद गमवावं लागणार असून अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. काल अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्स लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदा वक्तव्य केलं. (Sunil Tatkare On ajit pawar over chief minister)
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चित्र संदिग्ध चित्र आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे यांच्या शिवसेनेतही अस्वस्थता कायम असल्याचे दिसून येत आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी सुनील तटकरे यांना विचारले असता, ते म्हणाले की, राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही ज्यावेळी सहभागी झालो. त्याच वेळेला मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टता आली. आता एनडीएचे घटक आम्ही आहोत. मुख्यमंत्रीपद अजित दादांना मिळावं अशी राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु, भविष्यात आम्ही एकत्र लढणार आहोत. त्यामुळं सध्याच्या राजकारणातील अपरिहार्यता लक्षात घेता आज मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न उद्भवत नसल्याचं तटकरेंनी सांगितल.
IND A vs PAK A : अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवत पाकिस्तानने पटकावला आशिया चषक
काल सीएम एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावरून संजय राऊत यांनी शिंदेंना निरोप द्यायची वेळ आल्यानं त्यांना दिल्लीचं बोलावणं आलं, अशी टीका केली. या टीकेविषयी विचारलं असता तटकरे म्हणाले, विनायक राऊत, संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. गेल्या वर्षभरात ही नेते मंडळी सत्ताधारी पक्षांवर टीका करण्यापेक्षा काही करत नाहीत. मात्र आता आम्ही टीका-टिप्पणीपासून दुर राहून जनतेची कामं करण्याला प्राधान्य दिलं असून आम्ही सकारात्क राजकारण करणार आहोत, असं तटकरे म्हणाले.
अर्थखात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आठवडाभरातच अजित पवार यांनी आमदारांना निधीचे वाटप केलं. या निधीवाटपावरून शिवेसेना आमदार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. यावरही तटकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवारांनी निधी वापटात कुणालाही नाराज केलं नाही. शिवसेनेच्याही आमदारांना चांगला निधी दिला. त्यांना जेवढा निधी मिळणं अपेक्षित होतं, तितका निधी त्यांना मिळाला. अजित दादांनी निधीच्या बाबतीत सर्व आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं तटकरे म्हणाले.