Sunil Tatkare on Demenad for CBI Investigation of Ajit pawar plane crash to CM Fadanvis : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष सुनील तटकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन दिल्याची माहिती दिली.
फरहान अख्तर यांच्या हॉलीवूड डेब्यूचे Amul India कडून मजेशीर टॉपिकलद्वारे सेलिब्रेशन
अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, युवा नेते पार्थ पवार उपस्थित होते.
अपप्रचार नियोजनपूर्वक पसरविला; हर्षवर्धन सपकाळांनी दिलगिरी मागतानाही भाजपला घेरले !
याबाबत माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले की, आमच्या सीबीआय चौकशीच्या मागणीच्या निवेदनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याचं अश्वासन फडणवीसांनी दिलं. तसेच ज्या दिवशी ही दुर्देवी घटना घडली. त्या दिवशीच याच खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील तेथे उपस्थित होते. त्यामुळे या अपघाताची चौकशी करण्यासाठी स्वायत्त संस्था अगोदरच नेमलेली आहे. मात्र यामध्ये आणखी सखोल तपासासाठी आम्ही सीबीआय चौकशीची मागणी आहे.
‘नेचरल स्टार’ नानी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘द पैराडाइज’मधील पहिले गाणे ‘आया शेर’ होणार प्रदर्शित!
तसेच चव्हाण यांच्या भेटीबाबत सांगताना तटकरे म्हणाले की, सीएम सोबत भेट झाली. त्यानंतर आज रवींद्र चव्हाण आता भेटण्यास आले. जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यानंतर अनेक ठिकाणी एकत्र जाण्यासाठी चर्चा केली. पुढील काळात अनेक ठिकाणी आम्ही एकत्र सत्ता स्थापन करणार.तटकरे – आमदर नाराजी व्यक्त नाही केली. पुढील काळात पक्ष संघटना काम करण्याची चर्चा झाली. तर मंत्री झिरवाळांबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की, कार्यालयात कोणतेही वाईट बाब खपवून घेतली जाणार नाही अशा सूचना दिल्या.संबंधित चुकीच काम करणारे यावर कारवाई थेट केलीच पाहिजे.
