Download App

शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका, SC ने अजित पवारांना फटकारलं

  • Written By: Last Updated:

Supreme Court to Ajit Pawar Group : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाला निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवार यांच्या फोटोचा वापर करू नये, असं सांगितलं आहे. स्वत:ची ओळख निर्माण करा आणि मते मिळवा, असं न्यायालयाचे म्हणणं आहे. निवडणुका आल्या की शरद पवार (Sharad Pawar) लागतात, पण निवडणुका नसतात तेव्हा त्यांची गरज नसते, असेही कोर्टानं नमूद केले आहे. त्यामुळं शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Government Schemes : प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडली होती. त्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेस विभागली गेली. राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला होता. यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला तुतारी चिन्ह आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे नाव दिलं.

Government Schemes : प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

या निकालानंतर शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज (14 मार्च) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
यावेळी
शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या लोकप्रियतेचा वापर सुरू आहे, अजित पवार गट शरद पवार यांचे नाव व फोटो वापरत असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. याचा पुरावाही त्यांनी कोर्टात सादर केला.

सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाच्या पोस्टर्सवर न्यायालयाने पाहावे. त्यावर शरद पवार यांचा फोटो आणि नाव आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिलेले असताना अजित पवारांचा गट शरद पवारांच्या फोटो कसा वापरू शकतो, असा सवाल सिंघवी यांनी केला.

सिघंवी यांनी केलेल्या युक्तीवादात तथ्य असल्याचं समोर येतांचं कोर्टाने अजित पवारांना फटकारलं. कोर्ट म्हणाले की, पक्ष वेगळा असेल तर मग अजित पवार शरद पवारांचा फोटो का वापरतात? शरद पवारांची लोकप्रियता वेगळी आहे, तुमचा राजकीय पक्ष वेगळा आहे. शरद पवारांचा फोटो आणि नाव कुठेही वापरले जाणार नाही, असं लिहून द्या, असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने दिले.

follow us

वेब स्टोरीज