Government Schemes : प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : केंद्र सरकारच्या (Central Govt)ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना (Pradhan Mantri Solar Panel Yojana)सुरु करण्यात आली आहे. पीएम सोलर पॅनेल योजनेंतर्गत, लाभार्थी हे पाच एकर जागेवर 1 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प (Solar power plant)उभारल्यास, वीज पुरवठादार तुम्हाला प्रति युनिट 30 पैसे देतील. एक मेगावॅट सोलर प्लांट एका वर्षात 11 लाख युनिट ऊर्जा निर्माण करणार आहे. त्यामुळे लाभार्थ्याला एक प्रकारे चांगला आर्थिक फायदा मिळणार आहे.

BMC मध्ये नोकरीची संधी, महिन्याला 81 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेची उद्दिष्टे :
– या योजनेंतर्गत सौर पॅनल बसवणारे शेतकरी इलेक्ट्रॉनिक मोटर चालवू शकतील आणि नंतर त्यांच्या पिकांना पाईपद्वारे पाणी देऊ शकतील.
– या योजनेचे सरकारचे उद्दिष्ट शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवणे हे आहे, कारण या योजनेमुळे शेतकरी बांधवांना सौर पॅनेलद्वारे निर्माण होणारी सौरऊर्जा वीज कंपनीला विकता येते, ज्यातून वीज कंपनी नफा मिळवू शकते.
– शेतकरी त्यांच्या शेतात सोलर पॅनल लावू शकतात आणि त्यातून निर्माण झालेली वीज विकू शकतात.
– अंदाजानुसार, एक मेगावॅटचा प्रकल्प प्रतिवर्षी 11 लाख युनिट ऊर्जा निर्माण करू शकतो. महामंडळ 30 पैशांना ऊर्जा युनिट खरेदी करू शकते.
– गॅस आणि डिझेलची गरज काढून टाकून शेतकरी या उर्जेचा वापर सिंचन पंपाला वीज देण्यासाठी सहज करु शकतो. यामुळे गॅस आणि डिझेल दोन्हीची बचत होईल, तसेच पैशांचीही बचत होईल.
– शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढविण्याचे जाहीर करण्यात आले.
– 20 लाख शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सौर योजनेचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेचा लाभ कसा मिळणार?
– मोफत सोलर पॅनल वापरुन दर महिन्याला वीज निर्मिती करुन शेतकऱ्यांना वार्षिक 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवता येणार आहे.
सोलर पॅनेलमुळे शेतकऱ्यांना पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पंपांवर पैसे वाचवता येतील.
– पूर्वी शेतकर्‍यांना डिझेल इंजिन वापरुन सिंचनासाठी महागडी डिझेल खरेदी करावी लागत होती.
– आता सौरऊर्जेवर चालणार्‍या इलेक्ट्रॉनिक मोटर्सच्या सहाय्याने सिंचन केले जाऊ शकते.
– सोलर प्लांटमुळे शेतकरी पिकांना योग्य वेळी सिंचन करु शकतील, परिणामी उत्कृष्ट कृषी उत्पादन होईल.
– या योजनेंतर्गत तुम्ही सौर पॅनेल खरेदी केल्यास, वीज निर्मिती करुन 5-6 वर्षात खर्च भरुन काढला जाईल.
– एक मेगावॅटचा प्लांट एका वर्षात 11 लाख युनिट ऊर्जा निर्माण करेल आणि तुम्ही सुरु केलेली ऊर्जा कंपनी प्रत्येक युनिट 30 पैशांना खरेदी करेल.
– या उपक्रमाची सुरुवात 10 हजार मेगावॅट अतिरिक्त जमिनीवर आधारित संयंत्रे आणि 1.75 दशलक्ष ऑफ-ग्रीड कृषी सौर पंपांच्या तरतुदीसह होईल.

अखेर निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला; वसंत मोरेंसह पक्ष प्रवेश होणार?

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– पासपोर्ट आकाराचे फोटो
– मोबाईल नंबर
– शिधापत्रिका
– उत्पन्नाचा दाखला
– बँक पासबुक

पात्रता निकष
– अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
– केवळ भारतातील कायमस्वरूपी रहिवासी पंतप्रधान मोफत सौर पॅनेल योजनेचा लाभ घेऊ शकतात.
– या योजनेसाठी फक्त जमिनीची कागदपत्रे असणारेच पात्र असणार आहेत.
– या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

हेल्पलाईन क्रमांक
शेतकरी त्यांच्या हेल्पलाइन क्रमांक 011-2436-0707, 011-2436-0404 वर संपर्क साधावा.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज