Download App

राजकीय वर्तुळाला चिंता मविआची; मात्र, पवार-ठाकरेंमध्ये चर्चा ताडोबाच्या वाघांची

  • Written By: Last Updated:

Supria Sule On Uddhav Thackeray Sharad Pawar Meet’s :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ येथे सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उत आला होता. एकीकडे मविआ फुटणार या चर्चांनी तिन्ही पक्षातील नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यात काल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याने अनेक तर्कवितर्क काढण्यात आले. मात्र, एकीकडे राजकीय वर्तुळात मविआ टिकणार की नाही याची चिंता लागलेली असताना, काल सिल्व्हर ओकवर ताडोबातील वाघांबाबत चर्चा झाली, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

मला कोणतीही क्लीनचीट मिळालेली नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

सुळे म्हणाल्या की, काल सिंहासन चित्रपटाला 44 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम होता. तो संपल्यानंतर मला घरी जाण्यास बराच उशीर झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चाय पे चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे भेटले की, आमच्यात साधारण बाळासाहेबांच्या आठवणी, मुलांचे करिअर, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होते. काल माझी आणि उद्धव यांच्यामध्ये सर्वाधिक चर्चा ही ताडोबावर झाल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले. सध्या ताडोबामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्याचे मॅन-अॅनिमल कॉन्फ्लिक्ट, आदिवांसीचे हक्क आदी विषयांवर दोन दिवसांपूर्वी चव्हाण सेंटरवर बैठक पार पडली होती. त्या बैठकीत चर्चा केलेल्या मुद्द्यांवरच काल जास्त चर्चा झाल्याचे त्या म्हणाल्या.

असली वक्तव्यं आधी बंद करा.. अजितदादा नाना पटोलेंवर भडकले !

काय म्हणाले शरद पवार

दरम्यान, काल  उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘आमच्यात काही मुद्द्यांवर वेगळी मते असली तरी महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत त्या सर्वांनी एकमताने आणि एकविचाराने काम करावे अशी चर्चा झाली आहे. आगामी काळात काही कार्यक्रम आखले असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा यावेळी झाल्याचे ते म्हणाले. सावरकर, अदानी मुद्द्यांवर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांची मते वेगळी असली तरी समन्वय राखून आगामी निवडणुकांना सामोरे जावे असे ठरले. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. त्यानंतर आता वंचितला आघाडीत घ्यायचे की नाही यावर मात्र सहमती होऊ शकली नाही.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार; शेतकऱ्याची धमकी

गौतम अदानींच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महाविकास टिकणार की नाही अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. आघाडी टिकणार नाही असा दावा भाजपकडूनही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे एकीकडे मविआ फुटणार या चर्चांनी तिन्ही पक्षातील नेत्यांची चिंता वाढलेली असताना काल सिल्व्हर ओकवर ताडोबातील वाघांबाबत चर्चा झाल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Tags

follow us