ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार; शेतकऱ्याची धमकी
Life Threat To Social Worker Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajre) यांना एका शेतकऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिलीय. मी 1 मे रोजी अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं एक पत्रच या शेतकऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठवलंय.
‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ !
अण्णा हजारे यांना आलेल्या धमकीमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधनी या शेतकऱ्याने पत्रात म्हटलं की, मी एक सर्वसामान्य शेतकरी असून माझ्या कौटुंबिक शेतीच्या वादाचे कारणातून माझ्या गटातील ९६ लोकांनी एकत्र येऊन माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आणली हो.
Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत
तसेच शेलार बाई नावाच्या दलित महिलेने माझ्यावर खोटी अॅट्रॉसिटी (Atrocity) केस दाखल करण्याचा कट रचला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास मी १ मे रोजी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे साहेब यांची हत्या करणार असल्याचा इशाराच या शेतकऱ्याने दिला आहे.
Salman Khan : सलमान खानला दिलेला दिलासा कायम; पत्रकाराला मारहाणीचे प्रकरण
या प्रकरणाबाबत मी सविस्तर तक्रार श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली असून याची नोंद घ्यावी, अशी विनंती धमकी देणाऱ्या शेतकऱ्याने केलीय.
दरम्यान, गायधनी यांचे शेतीचे वाद आहेत. त्यामध्ये हजारे लक्ष घालत नसल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे. हे कारण देत संबंधित व्यक्तीने १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन हत्या करणार असल्याची धमकी दिली आहे.