पवार कुटुंब, सगळे भाऊ, वहिनी माझा प्रचार करणार; सुप्रिया सुळेंनी सांगितला विजयाचा ‘इनसाईड प्लॅन’

बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या […]

Letsupp Image   2024 03 06T131933.981

Letsupp Image 2024 03 06T131933.981

बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुप्रियांसाठी कोण कोण प्रचार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्या बारामतीमध्ये बोलत होत्या. (Supra Sule On Loksabha Election Campaign )

‘मविआ’च्या बैठकीआधीच प्रकाश आंबेडकरांचा ‘खो’; 15 जागांचा उल्लेख करत सांगितला ‘तिढा’

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यावेळी माझी चौथी निवडणूक आहे. माझे सहकारी, कार्यकर्ते हे माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातले लोक हे माझा प्रचार करतात. तसंच पवार कुटुंबातले माझे सगळे भाऊ, वहिनी माझ्या घरातली मुलं, राजूदादा, वहिनी हे सगळे माझ्यासाठी म्हणजेच बहिणीसाठी उभे राहतात याचा मला आनंद आहे. या सर्वांमुळे मला आधार वाटतो असेही सुळेंनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा; अमित शाहांची तोफ धडाडली

अमित शाहंचाही घेतला समाचार 

काल (दि. 5) जळगावमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी शरद पवारांवर टीका केली होती. महाराष्ट्रातील जनता गेल्या 50 वर्षांपासून पवारांचा भार सोसत असल्याचे म्हणत पवारांनी 50 वर्षांचा सोडा फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा असे शाह म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, गेली 55 वर्ष राज्यात कुणी ही नेता आला तरी, शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. लोकसभा जवळ आली आहे, त्यामुळे सगळे कामाला लागले आहेत त्यामध्ये आम्हीही प्रचार करीत आहोत. बारामतीत शरद पवारांचे जुने सहकारी काम करीत असून, पवार कुटुंबातील लोकांना ज्यांना प्रचार करायचा आहे ते करतील असेही सुळे म्हणाल्या.

मोदी-शहा यांचा प्लॅन : नितीन गडकरी यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होणार?

साहेबांमुळेच बारामतीचं नाव; साहेबांना सपोर्ट देण्याची गरज

एकीकडे सुप्रिया सुळेंनी लोकसभेसाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगितले असतानाच दुसरीकडे साहेबांमुळेच बारामतीचं नाव असे म्हटले आहे. त्यामुळे साहेबांना सपोर्ट देण्याची गरज असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. युगेंद्र पवार डोरलेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आता सगळ्यात जास्त गरज आहे शरद पवारांना साथ देण्याची. मी आज राजकारणात नाही. मात्र, बारामतीत खूप वर्षापासून काम करतोय विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे, त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे. आज बारामतीची ओळख आहे ती शरद पवार यांच्यामुळेच. आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी बारामती हे नाव सांगितल्यानंतर शरद पवार यांचे गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यात जास्त गरज आहे साहेबांना सपोर्ट देण्याची त्यामुळे मी शरद पवारांसमोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version