Lok Sabha Election : ..तर बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार; तटकरेंनी थेट घोषणाच केली

Lok Sabha Election : ..तर बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार; तटकरेंनी थेट घोषणाच केली

Lok Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय  (Lok Sabha Election 2024) झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह दहा जागांची मागणी केली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या (Sunetra Pawar) उमेदवारीच्या चर्चा सुरू आहेत. यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी थेट घोषणाच करून टाकली आहे. जर जागावाटपात बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच निवडणूक लढतील अशी घोषणा तटकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या टप्प्याच्या आढावा बैठकीनंतर तटकरे यांनी ही घोषणा केली.

Sunil Tatkare : पृथ्वीराज चव्हाणांना ‘राष्ट्रवादी’ विरोधाची ‘सुपारी’ सरकार पाडल्याच्या टीकेवर तटकरे भडकले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. या बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थितह होते. या बैठकीत नाशिक, दिंडोरी, ईशान्य मुंबई, गोंदिया, भंडारा, हिंगोली, धाराशिव, रायगड या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. आजही आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, बारामती, शिरुर, परभणी, अहमदनगर, गडचिरोली या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती दिसत आहे. पक्षाच्या बॅनर्सवर अजितदादांसोबतच त्यांचेही फोटो दिसून येत आहेत. नुकतेच बारामती दाखल झालेल्या प्रचार रथावरही सुनेत्रा पवार यांचा फोटो दिसत आहे. अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या तर त्या पहिल्यांदाच खासदार होतील. यापूर्वी त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. पक्षातही त्या सक्रिय नव्हत्या.

बारामती लोकसभा : सुनेत्रा पवार लढणारच; म्हणूनच अजितदादा भावनिक झाले आहेत!

पार्थ पवार यांचाही विचार केला तर त्यांचे नाव काही कारणांमुळे मागे पडते. याचे कारण म्हणजे बारामतीमधील त्यांची तयारी. अजित पवार यांनी स्वतः प्रचारात भाग घेतला तरी पार्थ पवार यांची स्वतःची बारामतीमध्ये तयारी नाही हे स्पष्ट आहे. 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर ते पक्षात आणि राजकारणात फारसे सक्रिय दिसले नाहीत. याशिवाय भाजप आणि अजित पवार यांचे कितीही पाठबळ मिळाले तरीही पार्थ पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाल्यास सुप्रिया सुळे यांचे पारडे जड होऊ शकते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज