Download App

Supriya Sule : मंंत्र्यांना जरा आवरा, अन् जाहीर माफी मागा; भावी शिक्षकाला धमकी देणाऱ्या मंत्र्याला सुनावलं

Supriya Sule On Deepak Kesarkar : शिक्षक भरती प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी(Deepak Kesarkar) एका भावी शिक्षकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Surpriya Sule) चांगल्याच भडकल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांवर आवर घालून दीपक केसरकरांनी भावी शिक्षकांची जाहीर माफी मागण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भातील एक्स सुळेंनी पोस्ट शेअर केली आहे.

सुप्रिया सुळे पोस्टमध्ये म्हणाल्या, “महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो.

एक ज्येष्ठ मंत्री महोदय आजकाल जाहीर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Animal Movie: हैदराबादमध्ये ‘अ‍ॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

नेमकं काय घडलं होतं?
बीडमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर भावी शिक्षकांनी दीपक केसरकरांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, भावी शिक्षकांनी शिक्षक भरतीबद्दल विचारणा केली. शिक्षक भरतीची नोंदणी झालीयं पण पुढे प्रक्रिया होत नसल्याची तक्रार भावी शिक्षकांनी केली होती. त्यावर दीपक केसरकर भडकल्याचे दिसून आले.

फक्त केस पांढरे होऊन उपयोग काय? भुजबळांच्या तोंडी जोडायची भाषा…; मनोज जरांगेंचा पलटवार

दीपक केसरकर भावी शिक्षकांना म्हणाले, तू बेशिस्त करते आहे, तुझी माहिती घेऊन तूला अपात्र करायला सांगणार असल्याची धमकीच दीपक केसरकरांनी यावेळी दिली. या संभाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला होता.

दरम्यान, शिक्षक भरतीप्रकरणी सत्ताधारी मंत्र्यांकडून भावी शिक्षकाला अशी धमकी देण्याचं पहिलंच प्रकरण राज्यात घडलं आहे. दीपक केसरकरांच्या या धमकीवरुन राज्यातील भावी शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणी दीपक केसरकरांना सोडलं नाही. केसरकरांनी जाहीर माफी मागण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री दीपक केसरकर काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us