फक्त केस पांढरे होऊन उपयोग काय? भुजबळांच्या तोंडी जोडायची भाषा…; मनोज जरांगेंचा पलटवार

  • Written By: Published:
फक्त केस पांढरे होऊन उपयोग काय? भुजबळांच्या तोंडी जोडायची भाषा…; मनोज जरांगेंचा पलटवार

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर निशाणा साधला. ओबीसी आरक्षणाचा इतिहास कथन करताना त्यांनी जरांगे  यांच्यावर टीका केली. अरे पेटवायला अक्कल लागत नाही. जोडायला अक्कल लागते, असे म्हणत भुजबळ यांनी जरांगेवर निशाणा साधला. दरम्यान, आता मनोज जरांगे यांनीही यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे होणार, राज्य सरकारकडून समिती स्थापन 

आज माध्यांशी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं. तुम्हाला पदं दिली. आमदार-खासदार केलं. तुम्हीच मराठा समाजाला तोडलं. आता जोडायची भाषा करू नये. तुमच्या तोंडी जोडायची भाषा शोभत नाही, असं जरांगे म्हणाले.

राज्यघटनेने प्रत्येकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. कोणाला गावबंदी करता येऊ शकत नाही. गाव बंदी केली तर एका महिन्याची शिक्षेची तरतूद आहे, सरकार कायद्यानुसार कारवाई करणार आहे की नाही, असं भुजबळ म्हणाले. याविषयी विचारले असता जरांगे म्हणाले, भुजबळांना सत्तेचा गैरवापर करायचा. जातीय तेढ निर्माण करयाची. लोक हक्काने सांगतात, आरक्षण घेऊन या आणि मगच गावात या, हे लोक हक्काने सांगत आहेत. भुजबळांना हक्क काय असतो, अधिकार काय असतो, ते कळत का? असा टोलाही जरांगेंनी लगावला.

“प्रकाश आंबेडकरांनी अडचणीत असताना सहकार्य करावे” : छगन भुजबळ यांचे आवाहन 

वय झाल्यानं भुजबळ तसं बोलतात. फक्त केस पांढरे होऊन उपयोग काय? ते एका समाजाविषयी फक्त गरळ ओकत आहेत. ते बीडाला बीडला गेले, पण अंतरवलीत आले नाहीत. अंतरवलीतले लोक भुजळांचे नाहीत का? अंतरवलीतील लाठीचार्ज झाल्यावर भुजबळांनी लोकांचे अश्रू पुसले का नाहीत? असा सवाल करत मराठा समजााविषयी भुजबळांच्या मनात राग असल्याचा आरोप जरांगेंनी केला.

रोहित पवार-संदीप क्षीरसागर तुम्हाला भेटले का, असं विचारलं असता जरांगे म्हणाले की, मनसेचे, शिवसेनेचे, प्रकाश आंबेडकरांचे, रामदास आठवलेंचे अनेक माणसं मला भेटली. धनगर बांधव हेही भेटायला आले. भुजळासारंखी लोकामधील माणूसी मेली नाही, असा घणाघात जरांगेंनी केला. भुजबळांना दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे. त्यांना सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. त्यांना राजकारण करायचे आहे. त्यातून फायदा घ्यायचा. त्यामुळं त्यांना क्षीरसागरांचा पुळका आला. मात्र, हल्ला करणारे मराठा नाहीत, याची कबुली खुद्द क्षीरसागरांनी दिली.

भुजबळ काय म्हणाले?

मी काही बोलतो तेव्हा ते म्हणतात की मी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करतो म्हणतात. पण, त्यांच्या 15 सभा झाल्या. आमची एक सभा होते, तर म्हणतात, काहीहीह बोलतो. मात्र, मलाच शिव्या दिल्या जात आहेत. ते दगडफेक करतात. त्यांनी घरदारं जाळली. ते पेटवायला अक्कल लागत नाही. जोडायला, घडवायला अक्कल लागते.
भुजबळ म्हातारा झाला म्हणतात, होय मी म्हातारा झालो. तुम्हीही एक दिवस म्हातारे व्हाल. जेवढे माझे केस पिकलेत तितके आंदोलन मी केली. एका आंदोलनाने केस पिकली नाहीत, असं म्हणत त्यांनी जरांगेंवर टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube