Download App

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येकाची आस्था…

Supriya Sule यांनी राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे. यावर आपली भुमिका मांडली आहे.

Supriya Sule on Auragjeb Kabar : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांनवर टीका टीपण्णी करत आहेत. तर दुसरीकडे ही कबर पाडण्यास काही वर्ग समर्थन देत आहे तर काही विरोध करत आहे. या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भुमिका मांडली आहे.

बीड पुन्हा पेटले! थरकाप उडवणाऱ्या हत्या-आत्महत्यांची मालिका; सुप्रिया सुळे अमित शाहंना भेटणार

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाची आस्था वेगळी आहे.माझी विनम्र विनंती आहे सरकारने सर्वच्या आस्थेचा आदर करावा. माझी हात जोडून महाराष्ट्रातील 200 आमदाराच्या सरकारला विनंती आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे.शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इतिहासात जरूर रमा पण त्याचं गलिच्छ राजकारण करू नका.

फडणवीसही औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, दोघांचाही कारभार एकसारखा…हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

इतिहासकारांना त्याचा निर्णय घेऊ द्या. इतिहासकार ठरवतील काय योग्य? काय अयोग्य? आहे. प्रत्येकाच्या अस्थेचा सन्मान सर्वांनी करावा हेच आपल्याला शिकवलं आहे. इतिहासकारांना औरंगजेब कबरीबाबत काम करू द्या. यावेळी त्यांनी पुढे म्हटले की, जय शिवराय म्हणायला काय प्रॉब्लेम आहे,हे राज्याचे छत्रपती आहेत. जय शिवराय मध्ये समतेची भाषा आहे रयतेचा राज्य आहे . अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

धक्कादायक! नाईट क्लबमध्ये लाईव्ह शो दरम्यान भीषण आग; 51 जणांचा मृत्यू 100 हून अधिक जखमी

पुढे त्यांनी सांगितले की, मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना देखील मी बीड संदर्भात गेल्या वेळी भेट घेतली होती. त्यानंतर बीड संदर्बात वेगाने कारवाई झाली. मात्र हव्या त्या पद्धतीने ही कारवाई सुरू नसल्याने मा आता आणखी एकदा शाह यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. कारण संतोष देशमुख यांच्यासह इतरही राज्यासह देश हादरवून टाकणाऱ्या घटना बीडमध्ये घडत आहेत. त्यावर देखील त्यांनी लक्ष घालावं. सरकारला मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर मी त्यांना ते सहकार मंत्री असल्याने त्यांना राज्यातील शेतकऱ्यांसह साखर उद्योगाबाबत देखील मी त्यांना लक्ष घालायला सांगणार आहे. अशी माहिती सुळे यांनी दिली.

follow us