Download App

बाकी काहीही ऐकून घेऊ… बापाचा नाद करायचा नाही; सुप्रिया सुळेंचा अजिदादांना थेट इशारा

Supriya Sule :मुंबई : बाकी काहीही ऐकून घेऊ, पण बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटकारलं. त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी बोलताना सुळे यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारुन गेलेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP)उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याचवेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. (Supriya Sule Criticize on Ajit Pawar NCP Sharad Pawar BJP Narendra Modi)

वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दासू वैद्य यांची कविता आहे. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझं बाप माझी बुलंद कहानी… हा माझा बाप माझ्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा जास्त आहे. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊ.  मी महिला आहे, काही म्हटलं तर टचकन डोळ्यात पाणी येतं पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच अहिल्या होते, तीच ताराराणी होते.

आपली ही लढाई कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही, तर त्या भाजपाच्या प्रवृत्तीविरोधात आपल्याला लढायचं आहे. ही लढाई आहे. मला अजूनही ते शब्द आठवत आहेत. मला तेव्हा वेदना होत्या. चारपाच वर्षांपूर्वी मन थोडं हळवं होतं. आता जरा घट्ट झालं आहे. त्यामुळे ज्यांनी ते घट्ट केलं त्यांचे मी मनापासून आभार मानते. नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीला काय म्हणायचे, नॅचरली करप्ट पार्टी ना खाऊंगा ना खाने दुंगा, असं म्हणायचे पण जेव्हा मला गरज असेल तेव्हा पूरा खा जाऊंगा, असं म्हणत सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी पाठवले, फडणवीसांसोबत बैठका झाल्या; अजित पवारांचा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. सुळे म्हणाल्या की, काही लोकांचं म्हणणं आहे की, काही लोकांचं वय झालं आहे. त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत, त्यावर सुळे म्हणाल्या की, का बरं आशीर्वाद द्यावेत असा सवालही त्यांनी केला. सुळे म्हणाल्या की, रतन टाटा साहेबांपेक्षा तीन वर्षाने मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप देशात सर्वात मोठा आहे.

नऊ वर्षात काय झालं? सिलेंडरचा भाव काय आहे, जे पन्नास खोकेवाल्यांचं काय झालं? त्यांना तर विसरुनच गेले, असं म्हणत केंद्रावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार आहेत. सत्ता येते जाते, सत्तेने सुख मिळत नाही, संघर्ष होईल. आठ नऊ खुर्चा मोकळ्या झाल्यात त्यावर नव्या लोकांना बसता येईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लग्न झालं, संसारही थाटला, एकाचवेळी तीन-तीन, खडसेंनी दादांना सोडलं अन् फडणवीसांनाच धरलं…

त्याचवेळी सुळे यांनी राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्याकडे पक्षातून येणाऱ्या निवडणुकीत 33 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणीही केली. बाकीचे काय करतील हे माहित नाही, पण महाराष्ट्राची जनता याच योद्ध्याच्या मागे उभी राहील, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

आज नव्या उमेदीने पक्ष उभा राहणार आहे. पुन्हा एकदा ओरिजनल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा आणि चिन्ह ओरिजनल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहील असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव शरद पवार हेच आहे असेही यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags

follow us