Supriya Sule News : भाजपला ईडीची चौकशी म्हणजे एक इव्हेंट वाटत असेल, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, सध्या राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांची ईडी चौकशीचं सत्र सुरु आहे. नूकतीच रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आलीयं. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे.
‘Musafiraa’ ची सफर घडवणारे तिसरे गाणे रिलीज; ‘झिलमिल’ मधून झळकले मैत्री अन् प्रेम
सुळे म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांना ईडीची चौकशी म्हणजे एक इव्हेंट वाटत असेल. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले. ते नेते भाजपमध्ये गेले मग त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे काय? भाजपमध्ये गेल्यावर भाजप त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ करत असल्याचीही टीका सुळेंनी केलीयं. तसेच देशात सुरू असलेले दडपशाही आम्ही सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
Kanni New Poster: हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई केली जाते. विरोधक बोलला की, त्याच्यावर कारवाई केली जाते. ही नवीन पद्धत गेल्या आठ वर्षात सुरू झाली आहे. त्यामुळेच रोहित पवार यांना नोटीस आली असावी अशी चर्चा आहे. हा देश संविधानाने चालतो. राज्यात जर बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाबद्दल आवाज उठवणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मान्य असल्याचंही सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रासह मुंबईच्या विकासात उत्तर भारतीयाचं मोठं योगदान; राज्यपाल बैस यांचं मोठं विधान
तसेच यावेळी बोलाताना सुळे यांनी विविध मुद्द्यावरुन टीका केली आहे. भाजपची अदृश्य शक्ती नक्की काय निर्णय घेते? कागदपत्रे आणि जे काही सत्य आहे ते शरद पवारांच्या बाजूने असल्याचं राष्ट्रवादीच्या अपात्रता प्रकरणावर सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत, गेल्या काही महिन्यापासून त्यांना पगार मिळत नाही. संक्रातीचा काळ असल्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण देण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारने तात्काळ त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांची वेतन वाढ केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी सरकार दरबारी केली आहे.