Kanni New Poster: हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Kanni New Poster: हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Kanni Movie First Poster Released: समीर जोशी (Sameer Joshi) दिग्दर्शित ‘कन्नी’ (Kanni Marathi Movie ) या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ( First Poster Released) मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Marathi Movie) सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे (Hrutha Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यात दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)


मात्र यात अजिंक्य राऊत मिसिंग असल्यामुळे हे पोस्टर बघून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असणार. पोस्टरमधील चौघांचेही आनंदी चेहरे त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवत आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नांकडे झेप घेणारी ही ‘कन्नी’ ८ मार्चलाला प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

नवीन झळकलेल्या पोस्टरमध्ये हृता हार घातलेल्या बिग बेनला मिठी मारताना दिसत असून बाकी कलाकारांच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी सांगू पाहात आहेत. आता नेमके काय प्रकरण आहे? हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे. तरी या पोस्टरने मात्र सिनेरसिकांची उत्सुकता निश्चितच वाढवली आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट शूटिंगचे ‘चॅलेेंज’ पूर्ण

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ‘पोस्टर जरी तरुणाईला आकर्षित करणारे असले तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्ने ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. या सगळ्यांना जोडणाऱ्या ‘कन्नी’ची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसाठी खास हे नवीन पोस्टर आणले आहे त्यासोबतच पतंग उडवून मकर संक्रांत साजरीही केली. खूप धमाल केली. अशीच धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाही येणार आहे.’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube