Download App

Supriya Sule : पूर्वी पोर न्यायची आता वडीलही भाजपवाले न्यायला लागलेत, बायकांनो सांभाळून राहा

  • Written By: Last Updated:

“जमाना खराब है..! पूर्वी काँग्रेसची पोर ते न्यायचे आता तर वडील भाजपवाले नेऊ लागले आहेत. बायकांनो सांभाळून राहा.” असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला आहे.सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि राज्यातील सरकारवर कडाडून टिका केलीय.

यावेळी भाजपवर टीका करताना त्या मानल्या की, जमाना खराब है..! पूर्वी काँग्रेसची पोर ते न्यायचे आता तर वडील भाजपवाले नेऊ लागले आहेत. बायकांनो सांभाळून राहा. मी तर लाल मिरचीची पावडर घेऊन फिरते. आलाच कोणी घ्यायला तर डोळ्यात मिरची टाकणार. असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा : गणपती बाप्पा रवींद्र धंगेकरांना सद्बुद्धी द्या..भाजप कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपतीला आरती…

खरा हिंदू कोण ?

“त्यांनी आसामला भीमाशंकर दिल असलं तरी मी आसामला भीमाशंकर देऊ देणार नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना याना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचा अधिकार नाही. आपली आत्मीयता असलेला ज्योतिर्गलिंग त्यांनी आसामला दिला. त्यामुळे आता ते खरे हिंदू कि मी खरी हिंदू हे तुम्हाला ठरवायचं आहे.” हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

जातीत लग्न करा असे ठरवणारे हे कोण ?

भाजपवाले लग्नाबद्दल सतत उलटे लोकांना सांगत आहेत. ते सांगतात जातीत लग्न करा, पण जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले, असा प्रश्न विचारला.

यावेळी त्यांनी स्वतःच्याच घरातील उदाहरण दिले. त्या महालय की, “रेवतीचे (सुप्रिया सुळे यांची मुलगी) लग्न माझे पती सदानंद आणि मी ठरवू. अजित दादा रेवतीचा मामा आहे म्हणून ठरवेल तिचं लग्न कोणाशी करायचं. आमदार दत्तात्रय भरणे मामा व राज्याचे मुख्यमंत्री हे नाही सांगू शकत की रेवतीचं लग्न कुणाशी करायचं. सुप्रिया सुळे आता मुख्यमंत्री आहोत तुमची मुलगी ह्याच्याशी लग्न करेल, असं नाही सांगू शकत. आमच्या मुली आता शिकलेल्या आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. माझी मुलगी काय खाईल. कोणाशी लग्न करेल ती कसं जगेल, हे आम्ही कुटुंब ठरवू. किंवा ती निर्णय प्रक्रियेत असेल.’

Tags

follow us