Supriya Sule on BJP : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. देवरा यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजधानीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान, यावर मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर भाष्य केलं. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष कॉंग्रेसममय झाले, अशी बोचरी टीका सुळेंनी केली आहे.
‘माझ्यासाठी निर्णय घेणं सोपं नव्हतं पण’.. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत देवरांनी सांगितली ‘अंदर की बात’
आज सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुळेंनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी देवरा यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशाविषयी विचारले असता ते सुळे म्हणाल्या की, कॉंग्रेसला राजीनामा देणं हा देवरा यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राजकारणात अनेकदा तिकिटे कापली जातात. मात्र, त्यामुळं आपली विचारधारा सोडायची का नही? हा निर्णय वैयक्तिक पातळीवर घ्यायचा असतो. मिलिंद देवरा यांना माझ्या शुभेच्छा आहे. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यांच्या आई-वडीलांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध होते. यापुढेही राहतील. पण, आता भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष कॉंग्रेसवालेच झालेत. भाजपात काही टॅलेंटच उरलेलं नाही की काय अशी परिस्थिती आहे. किंवा त्यांच्या सगळ्या आघाड्यात कॉंग्रेस पक्षाचेच लोक दिसतात. त्यामुळं ज्या कार्यकर्त्यांना भाजपचा झेंडा इतकी वर्ष खांद्यावर घेतला आणि वर्षानुवर्षे सतरंज्या उचलल्या त्या कार्यकर्त्यांचं काय, असा सवालही सुळेंनी केला.
खर्गेंनी ‘तिरंगा’ सोपविला… राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात
दक्षिण मुंबईची जागा लढण्यासाठी महायुतीकडे सक्षम उमेदवार नसल्यानं त्यांनी देवरा यांना इंम्पोर्ट केलं, असा खोचक टोलाही सुळेंनी लगावला.
कॉंग्रेस सोडायचं कारणं काय?
देवरा यांचे कुटुंब आणि काँग्रेस पक्ष यांचे गेल्या साडेपाच दशकांपासूनचे नाते आहे. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते. तर मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार राहिलेले आहेत. आता दक्षिण मुंबईची जागा ही ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळं लोकसभेला या जागेवर ठाकरे गटाचाच नेता उभं राहणार हे स्पष्ट आहे. त्यामुळं देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला.