Download App

‘फडणवीस गृहमंत्री झाले की राज्यात क्राईम रेट वाढतो’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Supriya Sule On Devendra Fadnavis :  जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसातसा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शेतकरी आक्रोश मोर्चा काढून सत्ताधारी राज्य सरकार आणि केंद्र सरकावर सडकून टीका करणाऱ्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाल्याचा दावा सुळे यांनी केला. तर नागपूर शहर हे गुन्हेगारांची राजधानी असल्याची टीकाही केली.

IND vs SA Test : टीम इंडियाला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडू संघातून बाहेर 

आज माध्यमांशी संवाद साधतांना सुळेंनी फडणवीसांचा जोरदार समाचार घेतला. यावेळी बोलतांना सुळे म्हणाल्या की, फडणवीस हे यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते. तर आताच्या विद्यमान सरकारमध्ये ते गृहमंत्री आहेत. फडणवीसांची राज्य सरकारच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात अपयशी आणि निष्क्रीय गृहमंत्री म्हणून नोंद घेतली जाईल. सध्या त्यांना काय झालं, हेच मला समजत नाही. राज्यातील वाढती गुन्हेगारी पाहता त्यांना अधिकार नाहीत का, असा प्रश्न निर्माण होतो, असं सुळे म्हणाल्या.

चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार ! 

पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, याआधी अनेकदा त्यांच्यावर गृहमंत्रीपदावरून त्यांच्यावर सडेतोड टीका झाली आहे. यापूर्वी फडणवीस गृहमंत्री होते तेव्हा नागपूरचा क्राईट रेट वाढला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध पक्षनेतेपदी असतांना फडणवीस यांच्यावर आरोप करत नागपूर शहर हे गुन्हेगारांची राजधानी असल्याची टीका केली होती. आता फडणवीस गृहमंत्री झाल्यावर तोच प्रत्यय पुन्हा येत आहेत. फडणवीस राज्यचाचे गृहमंत्री होतात, तेव्हा राज्यात गुन्हेगारी वाढते, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

सरकारला पॉलिसी पॅरालिसीस
शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुती सरकारच्या धोरणावर त्यांनी हल्लाबोल केला. सरकारची धोरणे शेतकरी आणि गरिबांसाठी मारक असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारची धोरणे निश्चित नाही. धोरणात वारंवार बदल केले जात आहेत. थोडक्यात राज्याचे पॉलिसीला पॅरलेसिस झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला वेळ नाही. मात्र, अशीच परिस्थिती राहिला तर सरकारचं फिरणंही मुश्कील होईल, असा इशाराही सुळेंनी दिला.

follow us