Supriya Sule On Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे आता पत्रकार परिषदा घेऊन नवे-नवे दावे करत आहे. महाविकास आघाडीबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी एक मोठा दावा केला आहे. 2014 ला महाविकास आघाडीचा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. परंतु तो मी फेटाळून लावला होता. तर 2019 ला शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्लीला मी नेला होता, असा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामागे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) असल्याचे सांगितले जात होते. आता चव्हाण यांच्या दाव्याने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला आता राष्ट्रवादी (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर देत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले आहे.
मुलगा हवा म्हणून PSI पतीकडून पत्नीचा छळ; जबरदस्ती गर्भपात, जीवे मारण्याचा आरोप
महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत, ते दुर्दैवी राष्ट्रवादीला नेहमीचे चुकीच्या बॉक्समध्ये बसवितात. एक चांगले आहे, दिल्लीमधील मेन लीडरशीपबरोबर रोज गाठाभेटी होतात. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी त्यांचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मनात असे काही नाही, मी समजते. प्रत्येक बैठकीला ते राष्ट्रवादीला बोलवतात. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि देशातील काँग्रेसमध्ये कदाचित काही तरी सुसंवाद नसावा. पुणे असेल, महाराष्ट्र असेल या दोन्ही काँग्रेस आणि सेंट्रल काँग्रेसच्या लीडरशीपमध्ये काही तरी गॅप असेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
‘शाळेत गुरु नाहीत, मग देश विश्वगुरू कसा होणार?’; कन्हैया कुमारांचा मोदी सरकारला सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काय करतय ? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमची लढाई त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात क्लीअर कट सुरू आहे. आजही माझ्या मतावर मी ठाम आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे काल होते, आजही आहेत. उद्याही राहतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारबाबत काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2014 मध्येच आपल्यासमोर आला होता, असा दावा चव्हाण यांनी केला. मात्र त्यावेळी आपण हा प्रस्ताव तात्काळ नाकारला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. 2014 मध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सरकार स्थापनेचा प्रस्ताव आपण त्याच वेळी फेटाळला, असे चव्हाण यांनी सांगितले. त्यावेळी काँग्रेसची राजकीय भूमिका आणि परिस्थिती वेगळी होती. मात्र पुढील पाच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव आपणच पुढे केला, असा दावा त्यांनी केला. 2014 मध्ये नाकारलेला प्रस्ताव 2019 मध्ये प्रत्यक्षात आला आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या समीकरणाची सुरुवात 2019 मध्ये झाली, त्याची चर्चा प्रत्यक्षात पाच वर्षांपूर्वीच झाली होती, असे चव्हाण यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
