आंदोलक एक पावले मागे येतील, सरकारने शंभर पावले मागे यावे; रोहित पवारांचे सरकारला आवाहन

Rohit Pawar: विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याची भाषा सत्ताधारी आमदारांनी केलीय. हे चांगले आहे, सरकार एकजुटीला घाबरलेले आहेत.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rohit Pawar

पुणे: एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सत्यागृह आंदोलन पुण्यात सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हेही सहभागी झाले आहे. मागण्यांबाबत एमपीएससी आंदोलक एक पावले मागे येतील. पण आमची अपेक्षा आहे, सरकारला शंभर पावले मागे येऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.


थोरात-विखे-गडाख; सहकारातील मुरब्बी एकत्र… जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट!

राज्यभरातील विविध भागातून आलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वेटिंग लिस्ट, मुलाखतीबाबतच्या अपेक्षा, एका पदावर एकदा निवड झाल्यानंतर पुन्हा संधी न देणं या मुद्द्यांसह इतर अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. हे सर्व मुद्दे सरकार दरबारी मांडून ते सोडवण्याचा आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करु, असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांना रोहित पवार यांनी दिला आहे.

पुण्यातील आंदोलन महाराष्ट्राचं जंतरमंतर; फडणवीसांपर्यंत आवाज जाऊ द्या” संजय राऊतांचा हल्लाबोल

सरकारने चर्चा सुरू केली आहे. आमची अपेक्षा आहे. सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारची अपेक्षा असले, तर आम्ही एखादे पाऊल मागे येऊ. पण तुम्हाला शंभर पावले मागे यावे लागले. विद्यार्थांच्या मागण्या प्रामाणिक आहेत. त्या मान्य केल्या पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


गोपीचंद पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर

काल पुण्यातील एका आंदोलनात भाजपचे गोपीचंद पडळकर हे सहभागी झाले होते. त्या आंदोलनातून पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्ताधारी आमदाराने तिथे विद्यार्थी बसले आहेत. रोहित पवार आणि इतर बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला आम्ही काऊंटर करण्यासाठी आलो आहे, अशी भाषा वापरली. हे योग्य आहे का ? विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याची भाषा सत्ताधारी आमदारांनी केलीय. हे चांगले आहे, सरकार एकजुटीला घाबरलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठिंबाची एकजूट आहे. तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही, आम्ही, आपण संघर्ष करत आहोत, असे रोहित पवार म्हणाले.

follow us