Download App

धनंजय मुंडेंचं गलिच्छ स्टेटमेंट…100 लोक गायब, सीडीआर का काढले जात नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule Reaction After Dhananjay Munde Resignation : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder) मोठी अपडेट समोर आलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर आलीय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चौऱ्याऐंशी दिवस झाले. सातत्याने गोष्टी नवनवीन गोष्टी समोर येत होत्या. बीडमध्ये 100 ते 110 हत्या झाल्याचा उल्लेख वारंवार अनेकजण करत आहे. या सगळ्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलीय.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 100 लोक गायब झाले आहेत. त्यांची प्रत्येकाची फाईल उघडली गेली पाहिजे. जो कोणी या हत्येमध्ये सहभागी आहे, त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे असं सुप्रिया सुळे (Maharashtra Politics) म्हणाल्या आहेत.

महिला दिनाचं लाडक्या बहि‍णींना डबल गिफ्ट; सरकारकडून मोठी घोषणा, योजनेचे 2 हप्ते…

खंडणी हा गुन्हा पीएएमएलमध्येच असतो, मी इडी आणि सीबीआयची मागणी करणार आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. सुरेश धस आणि अंजली दमानिया वारंवार सांगतात की, सीडीआर काढा. अवादा कंपनीमध्ये खंडणीची मागणी झाली, त्यामध्ये कोण कोण होतं? हे सीडीआर बाहेर काढल्यानंतर समजेल असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

कृष्णा आंधळे कुठे आहे? त्याला अजून अटक का नाही केली? त्याचा सीडीआर का बाहेर काढला जात नाही? असा सवाल त्यांनी केलाय. वाल्मीक कराड आणि त्यांच्यामध्ये संबंध आहे. त्यांच्या प्रॉपर्टी एकत्र आहेत, असा वारंवार आरोप केला जातोय. धस यांच्याकडे पुरावे आहेत, म्हणूनच ते बोलत आहेत. ज्याने हा खून करताना साथ दिली, त्या प्रत्येकाला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केलीय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तारीख पे तारीख! उन्हाळ्यातही निवडणुका नाहीच

मंत्र्यांचा रेकॉर्ड कॉल होत नाही, असं सांगणं हास्यास्पद आहे, असे अनेक उदाहरणे आहेत. आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं. छगन भुजबळ यांचं स्टेटमेंट आलं, हे चांगलं आहे. पण ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट दिलं, ते गलिच्छ स्टेटमेंट आहे. मला धक्का बसलाय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा देशमुख कुटुंबाचा आणि स्वतःच्या नेतृत्वाचा देखील अपमान केला आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यांचा देखील मान ठेवला नाही, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

 

follow us