भाजप घर आणि पक्ष फोडतेच, पण आता विद्यार्थ्यांचे पेपरही फोडतेय; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

Supriya Sule : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन बड्या पक्षांची शकलं झाली. दोन पक्षातील गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता कॉंग्रेसमधीलही अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप (BJP) […]

दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीपासूनच त्यांची लाईन क्लिअर; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

Supriya Sule

Supriya Sule : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन बड्या पक्षांची शकलं झाली. दोन पक्षातील गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता कॉंग्रेसमधीलही अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप (BJP) आधी भ्रष्टाचाराचे आरोप करते, नंतर आपल्याच पक्षात विरोधकांना घेते. भाजप भ्रष्टाचारी जुमला पार्टी झाली. भाजप घर फोडते, पक्ष फोडतेच पण आता विद्यार्थ्यांचे पेपरची फोडत आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केली.

नगर शहरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, आठ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन 

आज पुण्यातील एका सभेत बोलतांना सुप्रिया सुळेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केलं. त्यावर बोतलांना सुळे म्हणाल्या की, आता काँग्रेस मुक्त भारताऐवजी काँग्रेसयुक्त भाजप झालं आहे. आज भाजप सत्तेत आल्यावर सगळेच बाहेरचेच दिसत आहेत. भाजपसाठी लाठ्याकाठ्या खाल्लेल्या मूळ भाजप नेत्यांचं-कार्यकर्त्यांचं वाईट वाटतं. सत्तेत यायची वेळ आली किंवा चांदीच्या ताटात जेवणाची वेळ आली की, पंक्तिला विरोधी पक्षातीलच लोक असतात, असं सुळे म्हणाल्या.

सुळे म्हणाल्या, भाजपने विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी सर्वांत मोठा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर केला. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतचर दोन दिवसांनीच अशोकराव भाजपसोबत गेले. आज भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. आधी आरोप करायचे, मग पक्षात घ्यायचं. ही भाजपची कुटनीती आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्व आज भाजपमध्ये दिसतात. त्यामुळं आता भाजप भ्रष्टाचारी जुमला पार्टी झाली आहे. चव्हाणांवर भाजपने केलेले आरोप खरे होते की खोटे होते? जर खोटे असतील तर भाजपने त्यांची माफी मागावी, असंही सुळे म्हणाल्या.

‘आर्टिकल 370’ आणि ‘क्रॅक’मध्ये कांटे की टक्कर; जाणून घ्या वीकेंडला कोण गाजवणार बॉक्स ऑफिस? 

भाजपने संजय राऊत आणि अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले. पण ते फुटले नाहीत. यांचा अभिमान वाटतो. आतापर्यंत भाजपने अनेक पक्ष फोडले. भाजप घर फोडतेय, पक्ष फोडतेच पण आता विद्यार्थ्यांचे पेपरची फोडत आहे. कितीतरी सरकारी भरतीचे पेपर फुटले. अलीकडेच तलाठी भरतीचा पेपर फुटला. फडणवीस म्हणतात कोणीतरी प्रुफ द्या, मग कारवाई करू. परिक्षेत कॉपी होत आहे, पेपर फुटत आहेत, याचे पुरावे या विद्यार्थांकडे आहेत. फडणवीस यांनी चौकशी करावी, असं सुळे म्हणाल्या.

पढं बोलतांना त्या म्हणाल्या की, सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतल्यानं दुःख झालं. कारण, त्या एक उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या लोकसभेत नसल्याची उणीव मला आणि भाजपच्या चांगल्या खासदारांना वाटेल, असंही सुळे म्हणाल्या.

Exit mobile version