Supriya Sule : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) प्रत्येक पक्षात जागावाटपावरून चढाओढ सुरूआहे. त्यातच काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने बारा जागा लढवाव्यात, असे म्हटलं. त्यांच्या या प्रस्तावावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं
बारामती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीविषयी विचारले होते. त्यावर बोलतांना सुळे म्हणाल्या की, पुढील आठवड्यात आमची बैठक होणार आहे. त्यावेळी आम्ही जागा वाटपावर सविस्तर चर्चा करू. कोणाला जागा मिळणार, हे आठ ते दहा दिवसांत कळेल, असं सुळे म्हणाल्या.
‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं
ट्रिपल इंजिन सरकारने कंबरडे मोडलं
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार आणि ट्रिपल इंजिन सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केले आहे. आज शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. कांद्या निर्याती बंदी घालून सरकारने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला.अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे प्रचंड नुकसान जालं. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. मोदी सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्या विरोधात आवाज उठवला म्हणून आमचे लोकसभेतून निलंबन झाले. परंतु, आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवणार आहोत,असं सुळे म्हणाल्या. पंतप्रधान मोदींनी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवावी, अशी मागणीही सुळे यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही त्यांचे अतिथी देवो भव म्हणून स्वागत करू. नाशिकमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचे हाल त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
आंबेडकरांनी सुचवलेला फॉर्म्युला काय?
प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाटणा, बेंगळुरू येथे भारत आघाडीच्या बैठका झाल्या. त्यानंतर मुंबईत तिसरी बैठक झाली. या बैठकीला त्यांना बोलावले जाण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही. त्यानंतर काल त्यांनी महाविकास आघाडीला पत्र लिहून नवा फॉर्म्युला सुचवला आहे. आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी प्रत्येकी १२ जागांवर निवडणूक लढवतील, तर वंचित राहिलेले १२ जागांवर निवडणूक लढवतील, असा फॉर्म्युला आंबेडकरांनी सुचवला आहे.