Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिन सरकारने केलं, अशी टीका त्यांनी केला.
इंडिया अन् मविआत येण्याआधीच आंबेडकरांचा फॉर्मुला; ठाकरे, पवार, खर्गेंना पाठवलं पत्र
खासदार सुप्रिया सुळेआज बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करतांनी त्यांनी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, सर्वसामान्य मायबाप जनतेत फिरलं, तर तुम्हाला कळेलचं की, आज जनता आणि शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे. आज शेतकऱ्यांच्या पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास सरकारने काढून घेतला. भापज सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, अशी टीकाही त्यांनी केली.
संदीप माहेश्वरींनी बाजार उठवलेल्या विवेक बिंद्रांचे बिझनेस मॉडेल नेमके कसे होते?
सरकारमध्ये पॉलिसी पॅरलिसिस
सध्या अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. पुणे जिल्हा नियोजन समिताचा निधी अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कोर्टात जाण्याचीही तयारी दर्शवली. याविषयी सुळेंना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी गेल्या चार महिन्यापासून सांगत आहे. या सरकारमध्ये पॉलिसी पॅरलिसिस झालेला आहे. राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या सारख्या मंत्र्यांला कॅबिनेटमध्ये कोणी त्यांचं ऐकत नाही. त्यामुळं वारंवार ते चॅनेल वर आपली भूमिका मांडत आहेत. अर्थात संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार सरकारमध्ये आणि कॅबिनेटमध्ये गँगवार चालला, तशीच परिस्थिती आहे, असं सुळे म्हणाल्या.
भाजप हा शेतकरी विरोधी
पुढ त्या म्हणाल्या, वैयक्तिक कुणाचा विरोध नसतो. हा विरोध चुकीच्या धोरणांचा आहे. वैयक्तिक कोणाशी नाही. आमची लढाई भाजपच्या शेतकरी विरोधी नीतीच्या विरोधात आहे. भाजप हा शेतकऱ्यांच्या आणि महिल्यांच्या विरोधी आहे. सर्वसामान्य गोरगरीब वंचित आणि कष्टकरी यांच्या विरोधात हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मनोज जरांगेंचं वीस जानेवारीपासून मुंबईत उपोषण सुरू होत आहे. आपण आरक्षण घेतल्याशिवाय, माघारी फिरणार नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं. त्याविषयी विचारले असता सुळे म्हणाल्या की, 20 जानेवारीपर्यंत जरांगे यांनी सरकारला मुदत दिली आहे. अजून तीन आठवडे बाकी आहेत. बघू काय होतंय ते, असं सुळे म्हणाल्या.