Suresh Navale On BJP : महायुतीचा (Mahayuti( जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg), नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्खीखेच सुरू आहे. तर याआधी भावना गवळी, (Bhavna Gawli) हेमंत पाटील यांची तिकीटं रद्द केल्यानं ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे नेते सुरेश नवले (Suresh Navale) यांनी मोठा दावा केला.
Kartik Aaryan: अभिनेत्याचं 12 वर्षाने मोठ्या अभिनेत्रीशी फ्लर्टिंग, व्हिडिओ व्हायरल होताच….
नवले म्हणाले, शिवसैनिकांनी उठाव करून ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. अनेक खासदार शिंदेंसोबत गेले. मात्र, विद्यमान खासदारांना आपली खासदारकीही टिकवता नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वेक्षणाच्या नावाखाली भाजप शिंदे गटाचे खच्चीकरण करत आहे. तीन विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली. भाजपने कृपाल तुमाने, हेमंत पाटील आणि भावना गवळींचा बळी दिला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चक्रव्युहात अडकवलं. त्यांचा अभिमन्यू झाल्याचा, दावा नवले यांनी केला आहे
मुख्यमंत्र्यांवर भाजपचा मोठा दबाव
नवले म्हणाले, भाजपने आयबीचा अहवाल, सर्वेक्षण तुमच्या विरोधात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांवर भाजपचा मोठा दबाव आहे. ते लढत आहेत. मात्र त्यांच्यावर सामूहिक दबाव टाकला जात आहे.
मित्रपक्षांचे उमेदवार पोसण्याचे काम सेना करते
ते म्हणाले, शिवसैनिकांचे खच्चीकरण केले जात आहे. हे चित्र आशादायक नाही. मित्रपक्षांचे उमेदवार पोसण्याचे काम शिवसेनेला करावे लागत आहेत. परभणीची जागा शिवसेनेची होती. ती जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपने घेतली. नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात येतेय. सातारची जागा शिवसेनेची होती. मात्र, ही जागा भाजपला देण्यात आली. आता हीच परिस्थिती असेल तर विधानसभेचे काय होणार? तुमच्या आमदारांविरोधात निगेटिव्ह सर्व्हे आहे. आयबीचा अहवाल नकारात्मक आहे, असं भाजप सांगेल.