Sushilkumar Shinde : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होत चालला आहे. त्या दरम्यान सर्वच क्षेत्रातील लोक या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात काहींच्या प्रतिक्रियांमुळे वादही निर्माण होत आहेत. त्यात आता सुशीलकुमार शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ज्यांना गरज आहे त्यांनीच आरक्षण घ्यावं. श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये. महाराजांचं नाव घ्यायचं अन् जातिव्यवस्थेवर चालायचं हे मला अजिबात मान्य नाही
श्रीमंतांनी नाही, गरज असलेल्यांनी आरक्षण घ्यावं…
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत की, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे. ज्यांना आता आरक्षणाची आवश्यकता त्यांनी आरक्षण सोडून द्यावं. तसेच जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी देखील आरक्षणाचा लाभ घेऊ नये. 1980 पर्यंत राज्यात जात हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता. त्यामुळे मला एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि जातिव्यस्थेवर चालायचं हे अजिबात आवडत नाही. असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.
Video : ‘हे प्रदर्शन करु नका…’; शहीद जवानाच्या आईसमोर मंत्र्यांचा लाजिरवाणा पब्लिसीटी स्टंट
तसेच ते असं देखील म्हणाले की, आरक्षण असो वा जात निहाय जनगणना असो या बाबतीत माझं मत पक्षापेक्षा वेगळं आहे. असंही ते म्हणाले . तसं पाहिलं तर जातिचा आणि आर्थिक परिस्थितीचा काहीही संबंध नाही. तसेच ते यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये असं देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे एकीकडे कॉंग्रेस पक्षातील इतर नेते मराठा आरक्षणासाठी आग्रही असाताना दुसरीकडे मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी मध्यमार्गी भूमिका घेतली आहे.
सौम्या विश्वनाथ हत्याकांडातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत कोर्टाचा निर्णय
याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, दिलेलं आरक्षण कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत टिकलं पाहिजे. सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अजित पवार यांनी आज माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे त्यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षण आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.