Download App

नरेश म्हस्के अजूनही बालिश, खासदार संपर्कात असतील तर नावं सांगा; सुषमा अंधारेंचा पलटवार

नरेश म्हस्के यांच्या अंगात थिल्लरपणा कायम असून ते मिळण्यासाठी आदळआपट करताहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

Sushma Andhare on Naresh Mhaske : उद्धव ठाकरे गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) केला होता. म्हस्के यांच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) प्रतिक्रिया दिली. म्हस्के यांच्या अंगात थिल्लरपणा कायम असून ते मिळण्यासाठी आदळआपट करताहेत, अशी टीका अंधारेंनी केली.

रोहित पवार स्वत: BJPमध्ये जाऊन मंत्रीपद मिळण्यासाठी उत्सुक..; अजितदादा गटाच्या आमदाराचा दावा 

आज सुषमा अंधारेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, खोक्यांच्या बळावर बेईमानी करून अपघाताने खासदार झालेल्या म्हस्के यांनी निष्ठावान लोकांशी बोलू नये. मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता आहे. परंतु ते मंत्रिपद आपल्याला मिळावं, यासाठी ते आदळआपट करत आहे. न्जूय सेन्स व्हॅल्यू तयार करून लक्ष वेधण्याचा बालिश प्रयत्न म्हस्के करत आहे. म्हस्के खासदार झाल्यानंतर बुद्धिची पातळी वाढले असं मला वाटायचं, पण त्यांचा थिल्लपरणा अजूनही गेलेला नाही, अशी खोचक टीका अंधारेंनी केली.

Pune Rain : पुणेकरांनो बाहेर पडू नका, पुढील तीन तास महत्त्वाचे 

आता आपण खासदार झालोत, थिल्लरपणा करून नये, गांभीर्याने बोलले पाहिजे, आपण केलेल्या विधानांना ठोस पुरावे असले पाहिजे, या गोष्टीचं त्यांना भनच नाही. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असू करू नये, संपर्कात असतील तर नावं सांगा, असं अंधारे म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या मुलाला सोडून एकनाथ शिंदे म्हस्के यांना मंत्रिपद देतील एवढं मोठं मन मुख्यमंत्र्याचं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

म्हस्के काय म्हणाले होते?
ठाकरे गटातील दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. त्या दोन खासदांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. मतदारसंघात कामे व्हावीत, अशी त्यांची इच्छा आहे. या दोन्ही खासदारांनी मोदींना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्याचे म्हस्के म्हणाले होते.

follow us