Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

मुंबई : भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढत असतानाच ठाण्यातील एका घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या ‘फडतुस’ या शब्दांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केला केली आहे. ‘महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (24)

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (24)

मुंबई : भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढत असतानाच ठाण्यातील एका घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या ‘फडतुस’ या शब्दांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केला केली आहे. ‘महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त फडतूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले की छत्रपती शिवरायांच्या बद्दल लाड, लोढा, कोशारी यांनी शिवरायांबद्दल असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत..विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत… क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत… परिचारक यांनी तर शहीद पत्नींच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत…

Letsupp Special : ठाकरे विरुद्ध फडणवीस : लाज वाटत नाही का? ते फडतूस!

पुढं त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले इथले लाखो युवक बेरोजगार झाले पण भक्त चकार शब्दांनी बोलले नाहीत… संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेमध्ये जे असंख्य मुस्लिम बौद्ध आणि अठरापगड जातीचे विविध धर्माचे संविधानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र आले त्यांचा विटाळ म्हणून विकृत मानसिकतेच्या लोकांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडल. त्या लाखो नागरिकांचा त्यांच्या जाती-धर्माचा एका अर्थाने अपमानच केला. पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत..

पण ‘फडतूस’ हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले… सारांश : ज्यांनी महाराष्ट्र आणि हा अवघा देश घडवला त्या महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त फडतूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?, अशी टीका सुषमा अंधारे यांनी भाजप केली आहे.

लोंढे म्हणाले, देशमुखांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज

ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटातील महिलांमध्ये तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. देवेंद्र फडणवीस लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री असा हल्लाबोल केला होता.

Exit mobile version