Sushma Andhare : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर दुसरीकडे आमदार राजन साळवी यांच्यावरही बेकायदा संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई सत्रावर ठाकरे गटाचे नेते चांगलचे संतापले आहेत. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर भाजपाचा जळफळाट झाला आहे. त्यामुळेच जनता न्यायालयावरून लक्ष हटवण्यासाठी सूरज चव्हाण यांना अटक केली, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. या कारवाईनंतर अंधारे यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि भाजपवर गंभीर आरोप केले.
सामान्य कार्यकर्ता ते आदित्य ठाकरेंचे राईट हँड; ‘ईडी’ने अटक केलेले सूरज चव्हाण नेमके कोण?
आदित्य ठाकरेंनी महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार भाजपसोबत गेले होते. पुण्यातील ललित पाटील प्रकरणही दडपून टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. आमच्यावर मात्र भाजप सुडबुद्धीने कारवाई करते, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.
ठाकरे गटाच्या नेत्यांना धमक्या – संजय राऊत
या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत भाजप सरकारवर जोरदार प्रहार केले. सूरज चव्हाण यांना झालेली अटक ही राजकीय आहे. शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सींमार्फत कारवाया होतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. सूरज चव्हाण, रवींद्र वायकर, राजन साळवी यांनाही धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आम्ही दोन दिवसांपूर्वी आम्ही जनता न्यायालयात जे केलं होतं त्याचा प्रभाव पडला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सूरज चव्हाण यांना अटक झाली. सूरज चव्हाण यांची अटक राजकीय आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेने चांगले काम केले. तरीसुद्धा खोटी प्रकरणे तयार करून साक्षी पुरावे गोळा करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
मातोश्रीबाहेर घातपाताचा कट? संजय राऊत म्हणाले, भाजपचं षडयंत्र, ठाकरेंच्या सुरक्षेची जबाबदारी