Download App

Sushma Andhare : ‘तोंडं बंद कराल म्हणजे, संपवाल का? धमकी देऊ नका!’ ‘त्या’ वक्तव्यावर अंधारेंचा संताप

Sushma Andhare : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्यांची तोंडं लवकरच बंद होतील असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार पलटवार केला आहे. अंधारे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

अंधारे म्हणाल्या, तोंडे बंद करणार म्हणजे काय करणार. संपवून टाकाल. नवाब मलिक, अनिल देशमुख यांना अडकवलं तसं अडकवणार. देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र व्हायला नको. जो कुणी ड्रग्सच्या विरोधात बोलेल त्यांनी शांत राहावे, अशी धमकी तुम्ही देत आहात. ललित पाटील नावाचा माणूस म्हणतो की मी पळालो नाही मला पळवलं. तो असं का म्हणतोय याचा आधी शोध घ्या. फडणवीस मी नेहमी भाऊ आणि वहिनी म्हणून सन्मान देते. मी तुमच्याकडे माहिती मागत आहे. तुम्ही धमकी देत आहात. फडणवीस धमकी देऊ नका.. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये हाच माझा हेतू आहे.

Sushma Andhare : ‘माफी सोडाच, एक शब्दही मागे घेणार नाही’; अंधारेंनी देसाईंना ठणकावलं!

माझ्याकडील सर्व पुरावे मी माध्यमांसमोर ठेवले आहेत. राज्याच्या यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेने तपास करावा अशी मागणी मी केली आहे. दादा भुसे यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली त्याचं मी स्वागत करते. पण, शंभूराज देसाई का इतके चिडले. ड्रग्सचा कारखाना उभा राहतो तरी तुम्हाला माहित होत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून देसाई अपयशी झाले, अशी खरमरीत टीका सुषमा अंधारे यांनी केली.

काय म्हणाले होते फडणवीस ?

ड्रग्ज फ्री महाराष्ट्र या संकल्पनेतून राज्यभरातील सरकारी यंत्रणा काम करत आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी नाशिकमधील या कारखान्याची माहिती मिळाली होती. या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. आता ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल, असं ते म्हणाले. मला काही गोष्टी कळल्या आहेत, पण त्याबद्दल नीट माहिती घेऊन योग्यवेळी मी बोलेन. पण, एवढंच सांगतो की, एक मोठी नेक्सस यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील.

धक्कादायक खुलासा! ललित पाटील पैशांच्या जोरावर पोलीस अन् डॉक्टरांना करायचा मॅनेज

Tags

follow us