Sushma Andhare : ‘माफी सोडाच, एक शब्दही मागे घेणार नाही’; अंधारेंनी देसाईंना ठणकावलं!

Sushma Andhare : ‘माफी सोडाच, एक शब्दही मागे घेणार नाही’; अंधारेंनी देसाईंना ठणकावलं!

Sushma Andhare : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात गंभीर आरोप करत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनीही प्रतिक्रिया देत अंधारेंना इशारा दिला होता. यानंतर आज पुन्हा एकदा अंधारे यांनी मंत्री देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. अंधारे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आणखी काही खळबळजनक आरोप केले. शंभूराज देसाई म्हणाले माफी मागा नाहीतर.. त्यांच्या नाही तर या शब्दाचा काय अर्थ होतो? मला धमकी देत आहेत का? असे सवाल उपस्थित करत मी जे काही बोलले त्यावर मी ठाम आहे. एक शब्दही मागे घेणार नाही. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही अशा शब्दांत अंधारे यांनी ठणकावले.

Sanjay Raut : फडणवीसांकडून राजकारणासाठी ललित पाटीलचा वापर, त्यांना नैराश्याने ग्रासलय; राऊतांचा आरोप

त्या पुढे म्हणाल्या, देसाईंशी माझं काहीच वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या खात्याशी संबंधित विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं देसाईंकडे आहे. हा विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. देसाई या खात्याचे मंत्री आहेत. त्यांची एक नाही तर असंख्य प्रकरणं बाहेर येत आहेत असा दावा अंधारे यांनी केला.

ससून रुग्णालयाच्या गेटवर दोन कोटींचे ड्रग्स मिळाले हे चिंताजनक नाही का? कोर्ट परिसरात चरस मिळाले हे गंभीर नाही का? नाशिकमध्ये कोट्यावधींचा ड्रग्सचा कारखाना सापडला याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का? असे सवाल अंधारेंनी उपस्थित केले. ललित पाटील पोलिसांच्या स्वाधीन झाला मी पळालो नव्हतो मला पळवून लावलं असं तो म्हणाला. मी स्वतः शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांची काळजी वाटते. पुण्याचा उडता पंजाब होऊ नये यासाठीच मी हे मुद्दे उपस्थित करत असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray : ‘मोदी सरकारच्या काळात कर्जबुडव्यांना ‘अच्छे दिन’; ठाकरे गटाचा घणाघात

उत्पादन शुल्कचे अधिकारी मंत्री देसाईंच्या मर्जीतले

उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी हे मंत्री देसाई यांच्या खास मर्जीतले आहेत. सुषमा अंधारे गरिबीतून आली आहे. ती वंचित घटकांतून आली आगे म्हणून तिली भीती दाखवणार आहात का, असा सवाल अंधारे यांनी मंत्री देसाई यांना विचारला. छत्रपती संभाजीनगरमधील ज्या कंपनीने 143 कोटींचा महसूल बुडवला त्या कंपनीची सुनावणी तुम्ही तुमच्या दालनात घेतली. याचे कारण काय? पुण्याचे उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनी बंद केलेली ताडी पु्न्हा का सुरू केली? असेही सवाल अंधारे यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube