Sanjay Raut : फडणवीसांकडून राजकारणासाठी ललित पाटीलचा वापर, त्यांना नैराश्याने ग्रासलय; राऊतांचा आरोप
Sanjay Raut : ललित पाटील प्रकणावरून राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान सध्या राज्याच्या राजकारणात ललित पाटील प्रकरणावरून खळबळ माजली आहे. विरोधकांकडून सत्ताधारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला जात आहे. यामध्ये आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘ललित पाटीलचा वापर फडणवीसांकडून राजकारणासाठी, त्यांना नैराश्याने ग्रासलय.’ असं म्हणत टीका केली आहे.
ललित पाटीलचा वापर फडणवीसांकडून राजकारणासाठी
फडणवीसांवर टीका करताना राऊत म्हणाले की, मुंबई, नाशिक, सोलापुर, पुणे येथे आतापर्यंत सातशे ते आठशे कोटीरुपयांचे ड्रग्स जप्त केलेले आहेत यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावं. तर ललित पाटील हा एक मोहरा आहे. ह्या ललित पाटील प्रकरणाचा गैरवापर गृहमंत्री राज्याच्या राजकारणासाठी करत आहेत. संपुर्ण नाशिक ड्रग्सच्या विळख्यात आहे. त्यामुळे उद्या शिवसेनेचा नाशिकमध्ये ड्रग्सच्या विरोधात मोर्चा आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुनवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन
राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातून येणारे ड्रग्ज हे गुजरात मधून येतं. हे देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे का? जे ड्रग्स पकडलं गेलं नाही. ते महाराष्ट्रात पाठवलं जात आहे आणि महाराष्ट्राला उडता पंजाब करून नशेच्या आहारी टाकण्याचा काम केलं जात आहे. तरुण पिढी उध्वस्त करण्याचं काम केलं जात आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर त्यांनी खुशाल याचं राजकारण करत राहावं. महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पहावं माझी हात जोडून त्यांना विनंती आहे की, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तर त्यासारखं वागा आणि बोला.
Veer Savarkar Secret Files’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात
तसेच यावेळी राऊतांनी एक मागणी केली ते म्हणाले की, नाना पटोले यांनी दोन कॅबिनेट मिनिस्टरची नावे सांगितली होती या दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे. त्यावर चौकशी कमिटी नेमावी. ज्यांच्यावर आरोप आहेत. हिम्मत असेल तर त्यांना अटक करून दाखवा. 2024 ची बॉर्डर लाईन लक्षात ठेवा 2024 ला तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. टाळ चिपळ्या का वाजवत बसला आहात नरेंद्र मोदींसारख्या. फडणवीस यांनी बोलावं या विषयावर एक आरोपी म्हणतो की मला पळवलं आहे.मग मंत्र्यांच्या आदेशाने त्याची तिकडे पूर्ण व्यवस्था झाली हा तो माफिया सांगत आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर आहे का? की त्यांना नैराश्याने ग्रासलं आहे. अशा शब्दांत राऊतांनी टीका केली आहे.